Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जाळ, धूर अन् धमाका…संगटच..’; ‘घर बंदूक बिरयानी’मधलं ‘आहा हेरो’ गाणं प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 1, 2023
in Hot News, Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ghar Banduk Biryani
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीझर इतका उत्कंठा वाढवणारा होता, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. या गाण्याला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. यानंतर आता ‘घर बंदूक बिरयानी’तील आणखी एक गाणं म्युझिक लॉन्च दरम्यान प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘आहा हेरो’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील ‘आहा हेरो’ या गाण्याचे शीर्षक जितके हटके तितकेच गाणे जबरदस्त आहे. एका वेगळ्या ढंगाचे, अंगाचे आणि रंगाचे हे गाणे आहे. जसे ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. तसेच या नव्या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला आहे. तर गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे भन्नाट गाणे अभिनेते सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाचे निर्माते नागराज पोपटराव मंजुळे या गाण्याबद्दल बोलताना म्हणाले आहेत कि, ‘आहा हेरो हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. त्यामुळे हे एकच नव्हे तर चित्रपटातील सर्व गाणी संगीत प्रेमींना नक्कीच आवडणार असा मला ठाम विश्वास अगदी पहिल्या दिवसापासून आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ए. व्ही प्रफुल्लचंद्र म्युझिकल असे का लिहिले आहे याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिलनंतर कळणार आहे’.

Tags: Akash ThosarGhar Banduk BiryaniInstagram PostSayaji ShindeYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group