हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रेक्षकांना गुदगुदल्या करणारा कुशल बद्रिके एक उत्तम अभिनेता आहेच. शिवाय तो एक उत्तम माणूसदेखील आहे. कशाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा तो व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. त्याच्या लेखणीतून तो इतका खोल व्यक्त होतो कि अनेकदा नेटकरी देखील त्याच्या शब्द प्रवाहात वाहत जातात. अशीच एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. सोबतच स्वतःचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेनं या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘माणसं आपली असतात आणि नसतातही, जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय, सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव “एक्स्ट्रा” सांगत नाही, “वन बाय टू”चं शेअरिंग “मॅच्युरिटीच्या बेरिंग” मध्ये हरवून गेलय कुठेतरी. फक्त “आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत”. पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात’.
“राहून गेल्या हाती, संभावनांच्या वेण्या!
विण गुंफता जीवाची, तू एकटा केविलवाण्या!!” :- सुकून
कुशलची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आतापर्यंत सगळ्यांना हसवणारा कुशल अचानक इतका गंभीर का झाला असेल..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कुशलची पोस्ट वाचून अनेक नेटकरी देखील भावुक झाले आहेत तर काहींनी कुशलला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘गुंफण महत्त्वाची, बाकी नाती टिकणं आणि टिकवण याची बेरीज वजाबाकी होतच असते’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘तुमच्या प्रत्येक लिखाणात गूढ आहे’. आणखी एकाने लिहिलंय, ‘काय अप्रतिम लिहिलंय, कडक !!’
Discussion about this post