Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुश्मिता सेनला हार्ट अटॅक; एन्जियोप्लास्टीनंतर अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sushmita Sen
0
SHARES
2.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील कलाकार आपल्या तब्येतीची शक्य तितकी काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असलेले कलाकार दिसताना फिट आणि फाईन वाटत असले तरी अनेकदा विचित्र आजारांशी यांची झुंज सुरु असते. फिटनेसचं नाव काढलं तर मलायका अरोरा, मंदिरा बेदी, करीना कपूर आणि सुश्मिता सेन या अभिनेत्रींची नावे अगदी सहज तोंडावर येतात. पण सुश्मिता सेनेच्या चाहत्यांसाठी अतिशय धक्कादायक अशी बाब समोर आली आहे. अलीकडेच सुश्मिताला हार्ट अटॅक येऊन गेला आणि यानंतर तिच्यावर एन्जियोप्लास्टीदेखील झाली आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली आहे. हि पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला नसेल तर नवलंच!

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

आपल्या फिटनेसबाबत इतकी काटेकोर असणारी आणि स्वतःच्या शरीराची इतकी व्यवस्थित काळजी घेणाऱ्या सुश्मिता सेनने स्वतःच आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत हि माहिती दिली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यामातून तिने वडीलांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘माझे वडील मला म्हणाले शोना तुझं मन आनंदी ठेवलंस, मजबूत ठेवलंस तर ते तुझ्या पाठीशी खंबीर उभं राहील जेव्हा तुला गरज असेल तेव्हा’.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

पुढे लिहिलंय कि, ‘मला काही दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक आला होता. माझी एन्जियोप्लास्टी झाली आहे आणि माझे कार्डिओलॉजिस्ट म्हणाले, तुझं हार्ट खूप मोठं आहे’. असं लिहित तिने हार्ट इमोजी आणि स्माइली इमोजी शेअर केले आहेत. पुढे लिहिलंय, ‘पण ही पोस्ट मी तुम्हाला चांगली बातमी द्यायला देत आहे. आता सगळं ठीक आहे आणि मी तयार आहे आणखी पुढील काही वर्ष चांगलं हेल्दी लाईफ जगण्यासाठी. तुम्हा सगळ्या चाहत्यांचा मी मनापासून आदर करत आणि तुमच्यावर प्रेमही करते. देवापेक्षा कुणी मोठा नाही..डुग्गा डुग्गा’. सुश्मिताची ही पोस्ट अगदी काही सेकंदातच प्रचंड व्हायरल झाली आहे आणि तिचे चाहते तिला स्वतःची काळजी घे असे सांगताना दिसत आहेत.

Tags: Bollywood ActressInstagram PostSushmita Senviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group