हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, आघाडीचा दिग्दर्शक आणि उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे तो विविध व्हिडीओ तसेच फोटोस शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. सध्या तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त आहे. पण तरीही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करायला हिंमत लागते म्हणे.. पाहूया हा व्हिडीओ नक्की आहे तरी काय..?
अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रसाद म्हणतोय कि, ‘आमच्या घरात दोन वाक्य कायम ऐकू येतात… एक.. कपडे ठेवायला जागाच नाहीये यार.. एक नवीन वॉर्डड्रॉप (कपाट) बनवूया…? आणि दुसरं.. बाहेर जायला माझ्याकडे कपडेच नाहीयेत यार… आणि ही दोन्ही वाक्यं एकच व्यक्ती बोलते..’, असं म्हणत प्रसादने थेट चाहत्यांनाच बुचकळ्यात पाडलंय आणि विचारलंय ‘ओळखा बरं ही व्यक्ती कोण?’ आता हे न कळायला किती मिनिटं लागतात हो!! ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पत्नी मंजिरी ओक आहे.
प्रसादने अगदी खोडकर आणि मजेशीर अंदाजात आपल्या बायकोची चाहत्यांकडे तक्रार केली आहे. यावर मंजिरीनेदेखील भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलंय कि, ‘मस्कारा (त्यांची पाळीव पेट) पण ना ? मला तीचं हे वागणं अजीबात आवडत नाही’. प्रसादचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि सोबतच यावर अनेक नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘भाऊ तुम्हाला भीती नाय का वाटत..? सॉलिड डेरिंग केलीये तुम्ही’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘अंतिम सत्य आहे सर ते !! नवऱ्याला तर त्याच्या ही कप्प्यात जागा नसते’. अन्य एकाने म्हटले, ‘दम असेल तर नाव घे त्या व्यक्तीच’
Discussion about this post