हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्र विचित्र फॅशन करून नेटकऱ्यांच्या डोक्याला ताप देणारी उर्फी जावेद प्रचंड जिद्दी आहे. खूप ट्रोल होऊनही उर्फी कधीच थांबली नाही. नुसतं ट्रॉलिंग काय तर अगदी पोलीस तक्रार होऊनही उर्फीने तिच्या फॅशन सेन्समध्ये काहीच बदल केलेला नाही. आता याच कौतुक करायचं कि टीका हा प्रश्न वेगळाच.. विचित्र फॅशनसाठीच उर्फी सातत्याने चर्चेत राहिली आहे. या फॅशनच्या जोरावर तिने लोकप्रियता, प्रसिद्धी, पैसा, चर्चा, लाइमलाईट मिळवेळी आहे. याशिवाय आता तिने एक चमकती आलिशान कार घेतली आहे. ज्याची किंमत ऐकून भल्याभल्यांचे डोळे पांढरे पडतील.
उर्फी जावेदने नवीन चार चाकी गाडी घेतली आहे. खरं तरं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये उर्फी एका नवीन कारसोबत दिसतेय. हा व्हिडिओ कारच्या शोरूम मधला असल्यामुळे उर्फीनेच नवी गाडी घेतली आहे असे सांगितले जात आहे. उर्फी जावेदने लाल रंगाची महिंद्रा जीप मेरिडियन खरेदी केली आहे. माहितीनुसार, उर्फीची ही दुसरी कार आहे आणि या कारची किंमत ३५ लाखांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. उर्फीच्या या नव्या कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर तिचे चाहते नव्या आलिशान कारसाठी तिचे अभिनंदन करत आहेत.
उर्फी जावेदने माध्यमांशी बोलताना सांगितले कि, तिने ही कार स्वत:साठी घेतली नसून तिच्या टिमसाठी घेतली आहे. ज्यामुळे तिची टीम या कारमधून तिच्यासोबत सगळीकडे प्रवास करू शकेल. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करताना तिला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे. एकाने लिहिले आहे कि, ‘या बाईने सिद्ध केलाय कि ना*डं होऊन खूप पैसे मिळतात.. कचरा परिधान करण्यालापण किंमत आहे’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘कपडे कमी घातले कि इतकी आलिशान गाडी घेता येत असेल… तर सगळे आता तेच करूया’.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post