हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बिग बॉसच्या घरात असताना ती आणि तिचा बॉयफ्रेंड रोहित प्रचंड चर्चेत राहिले. मात्र घरातील बदलत्या वाऱ्यांनी त्यांच्या नात्यात वादळ आणलं आणि हे नातं पत्त्याच्या घरासारखं कोसळलं. यानंतर बिग बॉसचा खेळ संपला पण हे नातं पूर्ववत होऊ शकलं नाही. रुचिरा सोशल मीडियावर नेहमीच आपली बाजू भक्कम मांडताना दिसली. याशिवाय ती अनेकदा प्रेरणादायी तसेच अर्थपूर्ण पोस्ट शेअर करण्यावर भर देताना दिसते. यावेळी देखील तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘केस पांढरे होतील, त्वचा निस्तेज होईल, स्नायू कमकुवत होतील.. त्यामुळे फक्त शरीर म्हणून जगू नका.. त्यापेक्षा काहीतरी अधिक जगा! रुचिरा म्हणते, अशा प्रकारे, एक सुंदर आत्मा घडतोय..’ रुचिराची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तिचे चाहते या व्हिडिओला चांगली पसंती देत आहेत.
रुचिरा जाधव हि कृष्णभक्त आहे आणि अनेकदा ती भक्तिपर पोस्ट देखील शेअर करताना दिसते. शिवाय तिचा स्वतःचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचे ५ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रुचिरा नेहमीच योगा, भक्ती आणि शांतमय जीवन जगण्याविषयी चाहत्यांना प्रेरणा देत असते.
त्यामुळे तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होताना दिसतात. तिची हि पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नव्हे, तर तिचे चाहते योगाचे व्हिडीओ मोठे बनवण्याची विनंती करताना दिसत आहेत. जेणेकरून तिला पाहून आपणही योग करू शकू अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post