हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ८ मार्च आणि आजच्या दिवशी सर्वत्र ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त सोशल मीडियावर अनेक मराठी सेलिब्रिटी विविध पोस्ट शेअर करत तमाम महिलांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मात्र आजचा दिवस काही खास स्त्रियांना समर्पित केला आहे. सोनाली सध्या तिच्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात ती ताराराणी यांच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे आजची हि जागतिक महिला दिनाची खास पोस्ट त्यांच्या पराक्रमाबद्दल भाष्य करणारी आणि त्यांच्यासारख्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांसाठी तिने शेअर केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये तिचे नवे मराठमोळ्या पेहरावातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणतेय कि, ‘भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी ‘रैन्हा डोस मराठे’ किंवा ‘मराठ्यांची राणी’ असेही संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत. अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री’.
पुढे लिहिलंय , ‘आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला. मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात’. सोनाली कुलकर्णीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत ही पोस्ट आवडल्याचे सांगताना दिसत आहेत.
Discussion about this post