हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली तरीही ते अद्याप सिने विश्वात जोमानं कार्यरत आहेत. त्यामुळे आजही अमिताभ बच्चन यांचे विविध प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे तर काही रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. यातील त्यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’चे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरु करण्यात आले. ज्याच्या शूटिंगदरम्यान बिग बी यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. याची माहिती अमिताभ यांनी स्वतःच्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली होती. यानंतर आज त्यांचे हेल्थ अपडेट समोर आले आहे.
"In Hyderabad at shoot for Project K, during an action shot, got injured, rib cartilage popped broke & muscle tear to the right rib cage. Cancelled shoot, did doctor consult & scan by CT at AIG Hospital in Hyderabad & flown back home," posts Amitabh Bachchan.
(pic 2: file pic) pic.twitter.com/BqHu6yKirL
— ANI (@ANI) March 6, 2023
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सोमवारी दिनांक ६ मार्च २०२३ रोजी आपल्या पर्सनल ब्लॉगच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘हैदराबादमध्ये’ प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान ॲक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली.
T 4575 – gratitude and love ever .. for your concern and wishes
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 7, 2023
त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमधील AIG रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला असून सीटी स्कॅनही केले. आता घरी परतलो आहे. मलमपट्टी करण्यात आली असून सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हो हे वेदनादायक आहे. हालचाल करण्यासाठी आणि श्वास घ्यायला त्रास होतोय’.
T 4576 – your prayers are the cure
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 7, 2023
यानंतर आता डॉक्टरांकडून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. त्यानुसार अमिताभ यांनी सांगितले आहे कि, ‘तुम्ही माझ्याकडे इतकं लक्ष देत आहात त्यासाठी तुमचे आभार. हळूहळू माझी प्रकृती सुधारत आहे. पण यासाठी थोडा वेळ लागणार आहे. डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्याचं मी नियमितपणे पालन करत आहे’.
T 4577 – I rest and improve with your prayers
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 7, 2023
प्रकृती फारशी ठीक नसतानाही अमिताभ यांनी मुंबईतील त्यांच्या जलसा बंगल्यावर होळीचं सेलिब्रेशन केलं आहे. तसेच त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छादेखील दिल्या होत्या.
T 4578 – Happy holi .. A Jamini Roy painting comes alive to celebrate Holi .. pic.twitter.com/NQnEU4eeCp
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 7, 2023
सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमिताभ याना पूर्ण अराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात जोपर्यंत बिग बी ठणठणीत होत नाहीत तोवर आरामाशिवाय पर्याय नाही. तरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे समजताच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
Discussion about this post