हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी जगभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला गेला. यानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट शेअर केल्या होत्या. यामध्ये सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिका फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनीदेखील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘आम्ही का तिसरे’ या चित्रपटातील स्वतःचे स्त्री वेशातील काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या चित्रपटात त्यांनी तृतीयपंथीयाची भूमिका केली होती. या काही खास आठवणी शेअर करत मिलिंद यांनी समस्त पुरुष वर्गाच्या डोळ्यात अंजन घालणारी आणि स्त्री वर्गाच्या सन्मानार्थ अशी एक पोस्ट शेअर केली आहे. पाहूया काय म्हणालेत मिलिंद..
मिलिंद यांनी लिहिलंय कि, ‘जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंतर वर्षातले ३६५ दिवस हे महिला दिनच आहेत आणि ते असायलाच हवेत. पण ठीक आहे काही पुरुषांना ८ मार्चला त्याची आठवण करून द्यावी लागते म्हणून आजचा महिला दिन. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचे खूप हाल झाले ,त्यांच्यावर खूप अत्याचार झाले, आजही परिस्थिती फार बदलली आहे असं नाही आहे’.
पुढे लिहिलंय, ‘सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ती खरी आपल्या देशात महिलांच्या जागृतीसाठी सुरुवात होती , शिक्षण महत्त्वाचं आहे, नाही पण , चार भिंतीतल्या शाळां मधलं शिक्षण महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर महिलांनी worldly wise होण गरजेच आहे, जे मी माझ्या लेकीला मिथिलेला तिच्या लहानपणापासून सांगत आलो आहे. घरातल्या चार भिंतींच्या बाहेर , वास्तवातलं शिक्षण खूपच महत्त्वाचा आहे. ज्यांना ते मिळालं किंवा मिळवता आलं , त्या आज पुरुषांपेक्षा खूप खूप पुढे निघून गेले आहेत, निर्गानेच स्त्रीला इतकं शक्तिशाली बनवला आहे, की त्या गोष्टीची स्त्रीला जाणीव नव्हती, पण एकदा का ती जाणीव झाली की तिला कोणीही अडवू शकत नाही… आदिशक्ती ती, प्रभूची भक्ती ती, झाशीची राणी ती, मावळ्यांची भवानी ती, प्रयत्नांना लाभलेली उन्नती ती, आजच्या युगाची प्रगती ती. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे. माऊली तुला शतशत प्रणाम!!’
Discussion about this post