हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. एक उत्तम अभिनेता, सृजनशील लेखक आणि दर्जेदार कवी अशी याची ओळख. संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. विविध पोस्ट, कविता आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अलीकडेच त्याची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका संपली पण तो समीर सगळ्यांच्या स्मरणात राहिला. चित्रपट, मालिका यांशिवाय संकर्षण रंगभूमीवर ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात वसला आहे. यावेळी एका बॉलिवूड कलाकाराने या नाटकाला हजेरी लावली होती आणि याचा आनंद संकर्षणने शेअर केला आहे.
संकर्षणने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘# तू म्हणशील तसं’च्या कालच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत अंधारात कुणीतरी ओळखीचा चेहरा दिसला.. मी पहिल्या प्रवेशाच्या Exit नंतर आतून डोकवून पाहिलं तर… # bollywood मधला लाडका, फेमस अभिनेता शर्मन जोशी आला होता.. पूर्ण प्रयोग त्यांनी मन लावून पाहिला.. त्यांना नाटक खूssssप आवडलं .. खूप कौतुक पण केलं .. फार फार भारी वाटलं बघा .. स्टाईल, गोलमाल, ३ ईडियट्स सारख्या सिनेमांत पाहिलेला हा माणुस आपलं कौतुक करत होता.. मज्जा आली आणि काम तुम्ही कुठ्ठेही करा हो.. नाटकवाला माणुस नाटकाकडे येतोच .. थँक्यू सो मच शर्मन जोशी सर..’
होय.. संकर्षण कऱ्हाडे आणि काजल काटे अभिनित ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगासाठी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शर्मन जोशी उपस्थित राहिला होता. अभिनेता शर्मन जोशीने आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड सिनेविश्वात स्वतःचे असे भक्कम स्थान निर्माण केले आहे. पण त्यानेसुद्धा त्याच्या कारकिर्दीची सुरवात ही रंगभूमीपासून अर्थात नाटकापासून केली होती. शर्मनने हिंदी तसेच गुजराती भाषिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. शर्मन शेवटचा ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात झळकला होता. यानंतर बराच काळ तो चित्रपटात दिसलेला नाही.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post