हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे रविवारी सकाळी ८.४० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ९०’व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माधुरी दीक्षितने याबाबत स्वतः माहिती दिली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते, ‘आमच्या प्रिय आई स्नेहलता दीक्षित आज सकाळी आपल्या जवळच्या व्यक्तींना सोडून निघून गेली. तिच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत’.
माधुरी दीक्षित आणि तिच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे नाते काही वेगळेच होते. आई आणि मुलीपेक्षा त्या दोघीही एकमेकींसोबत कायम मैत्रिणीसारख्या राहिल्याचे माधुरीने अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे माधुरीच्या आईचे निधन झाल्यानंतर तिने स्वतःची अत्यंत जवळची मैत्रीण देखील गमावली आहे. दिनांक २७ जून २०२२ रोजी, माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचे फोटो शेअर करत एक पोस्ट केली होती. यामद्ये वयाच्या नव्वदीतही तिच्या आईच्या चेहऱ्यावरील तेज पाहण्यासारखे होते.
My 90 yo mother in law paints. She has macular degeneration & can’t see too well.But what comes out of her mind is remarkable.She is the loveliest, most positive person in the world.We had her paintings placed on mugs to remind us of her talent. #SaturdayMood #Saturday #Art pic.twitter.com/AByVqRj5o5
— Dr. Shriram Nene (@DoctorNene) February 25, 2023
माधुरीने शेअर केलेल्या पोस्टचे औचित्य होते आईंचा वाढदिवस. यामध्ये पहिल्या फोटोत माधुरी तिची आई आणि पती श्रीराम नेने यांच्यासोबत दिसते आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, ते म्हणतात की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते. ते अधिक योग्य असू शकत नाहीत. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तुझ्याकडून माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. मी तुम्हाला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची शुभेच्छा देतो!’ माधुरीच्या आई एक सकारात्मक व्यक्ती होत्याच शिवाय त्या या वयातही आपला छंद मोठ्या उत्साहाने जोपासत होत्या. त्यांनी पेंट केलेल्या वस्तू त्यांची आठवण करून देईल आणि त्यांच्या प्रतिभेची जाणीव करून देत राहील.
Discussion about this post