हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट तर गाजलाच शिवाय यातील गाणीही तुफान गाजली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने तर इतिहास रचत यंदाचा ९५ वा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि आज या भव्य ऑस्कर सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला. यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र या गाण्याचे कौतुक होत आहे. तसेच शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
The #Oscar for Best Original Song goes to "Naatu Naatu." https://t.co/wgCluOYWZT pic.twitter.com/EqpKOH8Iyh
— Variety (@Variety) March 13, 2023
यंदाच्या ९५व्या ऑस्कर पुरस्कारांना धमाकेदार सुरुवात झाली आणि भारतीय चित्रपट नवा इतिहास रचताना दिसू लागले आहेत. ऑस्कर २०२३ साठी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते आणि तेव्हापासून भारतीयांचे लक्ष या सोहळ्याने वेधले होते. कारण या श्रेणीत नामांकन मिळवणारा RRR हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. त्यामुळे चाहत्यांना विजयाची आशा होती आणि अखेर तो दिवस आलाच. RRR ने ऑस्कर २०२३ मध्ये यशाचा झेंडा फडकावलाच.
"Naatu Naatu" from #RRR wins Best Original Song at the #Oscars. https://t.co/ndiKiHfmID pic.twitter.com/d7ZSoRps2d
— Variety (@Variety) March 13, 2023
यंदाचा ९५ वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर २०२३ लॉस एंजेलिसमध्ये पार पडतोय. या अवॉर्ड शोसाठी अगदी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतचे दिग्गज सेलिब्रिटी नेहमीच आतुर असतात. त्यामुळे यंदाही शॅम्पेन (रेड) कार्पेटवर दिग्गज मंडळींनी चार चांद लावले आहेत. या रेड कार्पेटवर हे सेलिब्रिटी त्यांच्या अनोख्या अंदाजात आणि कमाल फॅशनेबल लूकमध्ये दिसत आहेत. शिवाय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यंदा ऑस्कर २०२३ च्या प्रस्तुतकर्ता अर्थात होस्ट ग्रुपचा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे यंदाचा ऑस्कर भारतीय सिनेसेलिब्रिटी गाजवताना दिसत आहेत.
Discussion about this post