हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या जोड्या ट्रेंडिंगमध्ये असतात. जसं कि, ‘मलायका अरोरा- अर्जुन कपूर’, ‘सैफ अली खान- करीन कपूर खान’, ‘अनुष्का शर्मा- विराट कोहली’, ‘आलीया भट्ट- रणबीर कपूर’, ‘सिद्धार्थ मल्होत्रा – कियारा अडवाणी’ आणि आता याच यादीत आणखी एका जोडीचं नाव लवकरच सामील होणार आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यामध्ये काहीतरी नातं खुलतय अशी चर्चा आहे.
काही महिन्यांपासून बी- टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकत्र दिसले होते. हे दोघेही एकमेकांसोटाबा या पार्टीत पोहोचले आणि सतत एकत्र दिसले. त्यामुळे यांच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदार सुरु झाली. याशिवाय अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती आणि आता त्या दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केल्यानंतर नेमकं शिजतंय काय.? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
लॅक्मे फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. पण चहरचा झाली ती आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या केमिस्ट्रीची. या फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दोघेही मनिष मल्होत्राचे शो स्टॉपर होते. त्यांनी एकत्र वॉक केला आणि विविध पोजसुद्धा दिल्या. हे फोटो आणि या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये आदित्यने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता तर अनन्याने हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. दोघेही एकत्र कमालीचे भारी दिसत होते. त्यामुळे लवकरच हे अधिकृत कपल व्हावं अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post