हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी, बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत विविध दमदार भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे केवळ एक अभिनेता नसून समाज भान जपणारे व्यक्तिमत्व आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे.
येत्या काळात ते नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. जंगल संवर्धनासाठी काम करणाऱ्या सयाजी शिंदेंवर मधमाशांनी हल्ला केला आहे आणि यात ते जखमी झाले आहेत.
अभिनेते सयाजी शिंदे हे सिने सृष्टीत जितके सक्रिय आहेत त्याहून अधिक ते समाजसेवेत लीन असतात. ग्रामीण भागातील विविध प्रश्न, तसेच पाणी समस्या आणि जंगल संवर्धनासाठी ते नेहमीच आपल्या टीमसोबत कार्यरत असतात. वृक्ष वाचवण्यासाठी सुरु असलेली त्यांची धडपड कायम त्यांच्या कामातून दिसत असते. या कामासाठी त्यांनी आतापर्यंत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलाय. याच कार्यादरम्यान पुणे- बंगळूर महामार्गावर एका ठिकाणी ते झाडांचे पुनर्रोपण करत होते आणि यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला.
सध्या पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. यामुळे तेथील झाडांसाठी सयाजी शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत तासवडे येथे हजर होते. याठिकाणी कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्यांचे पुनर्रोपण करण्याची भूमिका घेत सयाजी शिंदे यांनी निसर्ग संवर्धनाकडे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पण याच दरम्यान त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याचे समजले आहे. याबाबत स्वतः सयाजी शिंदे यांनी माहिती देताना सांगितले आहे कि, ‘ मधमाशांचा हल्ला झाला.. २- ३ माशा चावल्यामुळे सुजलं आहे पण मी सुखरूप आहे’.
Discussion about this post