Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चर्चा रंगणार.. बातमी गाजणार!! मराठमोळ्या लावणीवर जेव्हा ‘पुष्पा’ची श्रीवल्ली थिरकणार; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rashmika Mandana
0
SHARES
199
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला ‘पुष्पा’ आणि त्याची श्रीवल्ली प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आधीच नॅशनल क्रश आणि त्यात सामी सामी करून तिने अख्ख पब्लिक खुळावलं. यानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि आता चक्क मराठमोळ्या लावणीवर थिरकताना दिसणार आहे. होय होय. मराठमोळी लावणीच. टॉलिवूडची श्रीवल्ली आपल्याला यंदाच्या ‘झी’ गौरव पुरस्कार सोहळ्यात लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे यंदाच्या झी चित्र गौरव २०२३ सोहळ्याचं ‘रश्मिका मंदान्ना’ची लावणी हे खास आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे तिने ही लावणी वन टेक मध्ये केली आहे. शिवाय निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत ती काही किस्से देखील शेअर करताना दिसणार आहे. नुकतेच या लावणीचे चित्रीकरण झाले असून याची एक झलक प्रोमोमधून शेअर करण्यात आली आहे. चंद्रमुखीच्या ‘चंद्रा’ या लावणीवर टॉलिवूडची श्रीवल्ली थिरकणार म्हणून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

येत्या रविवारी, दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘झी चित्र गौरव २०२३’ हा पुरस्कार सोहळा प्रक्षेपित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात आपल्याला रश्मिकाची हि भन्नाट लावणी पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘झी चित्र गौरव’ या सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली असताना आता रश्मिका मराठी लावणीवर थिरकणार हे ऐकून प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड आणखीच वाढली आहे. यंदाच्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा बहारदार डान्स परफॉर्मन्सदेखील आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे.

Tags: Instagram Postrashmika mandanaTollywood ActressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group