हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या चित्रपटाने बघता बघता कोट्यवधींची बक्कळ कमाई केली. चित्रपटात शाहरुख- दीपिकावर चित्रित झालेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चित्रपट काही दिवस वादात राहिला खरा.. पण या वादामुळे चित्रपटाची झालेली चर्चा त्याच्या कमाईसाठी कामी आली म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बॉलीवूडला पुन्हा एकदा पठाणमुळे चांगले दिवस पाहायची संधी मिळाली. हाच पठाण आता ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे ज्यांनी हा चित्रपट पहिला नाही ते घरबसल्या पाहू शकणार आहेत.
शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका करत बॉलिवूडवरील संकट परतवले. अनेक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यावर कौतुकाचा वर्षाव केला. दरम्यान ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही ते हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार या प्रतीक्षेत होते. तर आता प्रतीक्षा संपली आहे. शाहरुखचा ‘पठाण’ आता अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या आठवड्यात प्रदर्शित होतो आहे.
Shah Rukh Khan Starrer ‘Pathaan’s Extended Version To Be Released On OTT Platform ‘Amazon Prime Video’ On March 22nd, 2023!https://t.co/oLYEf3ltiI#ShahRukhKhan #RanbirKapoor #ShahRukh #SRK #Pathaan #Pathan #BoxOffice #DeepikaPadukone #JohnAbraham #YRF @PrimeVideo @yrf @iamsrk
— Box Office Worldwide (@BOWorldwide) March 15, 2023
‘पठाण’ हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार याची तारीख सुद्धा निश्चित झाली असून त्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाची विस्तारित आवृत्ती अर्थात एक्स्टेंडेड व्हर्जन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. येत्या २२ मार्च २०२३ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओवर ‘पठाण’ रिलीज होणार आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही ते आता घरबसल्या आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट एन्जॉय करू शकतात.
Discussion about this post