हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जात. याचं कारण या मातीला संतांचा पदस्पर्श लाभला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास या संतांनी ज्ञानाचा महासागर आपल्याला दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे आद्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी समर्थ रामदास यांनी मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून कार्य केले. त्यांचे मूळ नाव नारायण असले तरीही ते स्वतःला रामदास म्हणवून घेत. याचे कारण रामाचा सेवक म्हणजे रामदास. याच समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित एक चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे.
दक्खनमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात धार्मिक छळ होत होता. त्या काळात लोकांच्या आत्मविश्वासाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी भगवान श्री रामांना आदर्श मानून ‘धर्म ही माणसाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे’, असा संदेश लोकांना दिला त्या समर्थ रामदास स्वामींचे चरित्र फार विलक्षण आहे. त्यामुळे त्यांची शिकवण आजच्या पिढीतही रुजवण्यासाठी सिनेमास्टर्स एंटरटेनमेंट प्रस्तुत, समर्थ क्रिएशन्स निर्मित, डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रघुवीर’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. जो लवकरच आपल्याला चित्रपट गृहात बघायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध कॉमेडियन नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.
एक उत्तम गायक, अभिनेता, कॉमेडियन अशी ओळख निर्माण करणारे नवीन प्रभाकर एका नव्या भूमिकेत आपल्या भेटीस येत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच आलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. यानंतर आता नव्याने येऊ घातलेल्या ‘रघुवीर’ या मराठी चित्रपटातदेखील नवीन निगेटिव्ह भूमिका साकारत आहेत. कॉमेडियन म्हणून बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यांनतर आपल्या अभिनयाचा एक वेगळा पेहलू उलघडण्यासाठी नवीन खलनायकाच्या कॅटेगरीत काम करत आहेत. या चित्रपटात नवीन प्रभाकर यांच्यासोबत समर्थ रामदासांच्या मुख्य भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार आहेत. तर ऋजुता देशमुख, शैलेश दातार, विघ्नेश जोशी, राहुल मेहदेंळे, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, निनाद कुलकर्णी, देव निखार्गे, गणेश माने हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post