हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या थेट, स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी जास्त ओळखली जाते. विषय जनेतही असो त्यावर स्पष्ट बोलण्यावर भर देणे असा कायम पवित्रा असणारी सोनाली अलीकडेच एका मुलाखतीत सामाजिक प्रश्नांवर बोलताना तरुण पिढीवरदेखील बोलली आहे. तिचा या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिनं परखडपणे व्यक्त केलेल्या विचारांमूळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु आहेत. अनेकांनी तिच्या वक्तव्याचे कौतूक केले आहे तर अनेकांनी ट्रोल केले आहे. पाहुयात काय म्हणाली सोनाली..,
या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणतेय कि, ”भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते? अशा मुली घडवा ज्या समान वागणूक देतात. जे स्वत:साठी कमावत असेल. जी असं म्हणू शकेल की, घरात नवा फ्रिज घ्यायचा असेल तर अर्धे पैसे मी देईन’.
I don't know who she is but hats off to her courage to speak the unspoken unpalatable truth! 👏#Equality pic.twitter.com/vB2zwZerul
— Amit Srivastava 🕉️ (@AmiSri) March 15, 2023
पुढे असेही म्हणाली कि, ‘मी सगळ्यांना सांगू इच्छिते येत्या काळात तुम्ही अधिक स्वावलंबी व्हावं. तुमच्या पार्टनर सोबत खर्च देखील शेयर करावा. केवळ कुणावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही’. यावेळी सोनालीने केवळ मत प्रकट करायचे म्हणून केलेले नाही तर तिने समानतेचा अतिशय महत्वपूर्ण मुद्दा उचलून धरला आहे. मुलगा- मुलगी हा भेद न ठेवता प्रत्येकाने स्वावलंबी व्हावं असं एक ठाम मत यावेळी सोनालीने प्रकट केले आहे. तिच्या या मताचा अनेकांनी सत्कार केला आहे. सोनालीच्या विचारांचे अनेक महिलांनी स्वागत केले आहे तर काहींनी मात्र तिच्या बोलण्यातली फक्त धार वेचत ट्रोलिंग केले आहे.
Discussion about this post