Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील एक्झिटनंतर अभिनेत्याने सांगितलं मालिकेच्या टॉप TRP’चं कारण..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vikas Patil
0
SHARES
888
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने आता अत्यंत उत्कंठावर्धक वळण घेतले आहे. जयदीपने शालिनीचा पर्दाफाश केल्यानंतर आता शिर्केपाटील कुटुंबाला ‘मंगल’चा मोठा धक्का लागणार आहे. हि मंगल म्हणजे जयदीपची आई. हे एक नवे पात्र मालिकेत एंटर होत असताना दुसरीकडे शालिनीचा भाऊ राहुल मात्र एक्झिट घेऊन मोकळा झालाय. अर्थात राहुल हे पात्र साकारणारा अभिनेता विकास पाटील आता या मालिकेचा भाग नसेल. पण या भूमिकेबद्दल आणि एकंदरच अनुभवाबद्दल भावुक होत त्याने एक आभार प्रकट करणारी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने राहुल या पात्राच्या सर्व आठवणी एकत्र करून एक व्हिडीओ शेअर करत भलं मोठं कॅप्शन लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Patil (@vikaspatil.official)

अभिनेता विकास पाटीलने हि पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय कि, ‘अलविदा राहुल… अखेर राहुलचा सुख म्हणजे काय असतं मधला प्रवास संपला …असं वाटतंय काल परवाच शूटिंग सुरु झालं होतं.. जवळपास सात महिने ह्या मालिकेचा भाग होतो. पण हे सात महिने सात दिवसांसारखे वाटतायत. प्रत्येक मालिकेचं युनिट हे एका कुटुंबासारखं असतं आणि हे कुटुंब फारच जिव्हाळ्याचं आणि लाडकं ठरलं. ज्या प्रेमाने आणि आत्मीयतेने सगळ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं ते लाजवाब होतं. हि मालिका पहिल्यापासून नंबर वनला असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तिथली पॉसिटीव्हिटी असं मला वाटतं जी फार कमी ठिकाणी जाणवते..!’ ‘मला ह्या कुटंबाचा सदस्य करून घेतल्याबद्दल स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन यांचे मनापासून आभार. प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानायचे तर इथे थिसीस लिहावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पण प्रामुख्याने आमच्या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कानसे (सर आता फिल्म करूयात असं ज्यांना सतत म्हणायचो) पूर्ण डिरेक्शन टीम खास करून शशी तुम्ही सगळे कमाल आहात! महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, माधुरी देसाई आणि तिची संपूर्ण प्रोडक्शन टीम, आमच्या मालिकेचा लेखक आणि चांगला मित्र अभिजीत गुरु आणि त्याची टीम, आमचा क्रीटीव्ह हेड, संपूर्ण लाईट, आर्ट, कॉस्च्युम, मेकअप आणि स्पॉट दादांची टीम आणि लास्ट बट नॉट लीस्ट आमच्या सुपरहिट मालिकेचे सुपरहिट कल्लाकार…जुग जुग जियो.. और नाम रोशन करो आणि अर्थात सगळ्यात महत्वाचे आणि मानाचे तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी राहुलवर भरभरून प्रेम केलंत.. त्याला आपलंस केलंत, असंच प्रेम मी केलेल्या प्रत्येक पात्रावर कराल हा विश्वास आहेच.. मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन character सोबत लवकरच …. गणपती बाप्पा मोरया’.

Tags: Instagram Postmarathi serialstar pravahSukh Mhnje Nakki Kay AstVikas PatilViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group