हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘गोदावरी’ हा चित्रपट आल्यानंतर सोशल मीडियावर जितुमय वातावरण झाले होते. या चित्रपटासाठी जितूला अनेक सर्वोच्च पुरस्कार मिळाले. आपल्या अभिनयातून मनोरंजन करणारा हा अभिनेता सामाजिक भानदेखील जपतो. अनेकदा व्यक्त होतो आणि थेट मुद्द्याला हात घालतो. आज त्याने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे पण हि एक कविता आहे. या कवितेचा गर्भ, आशय, विषय सर्व काही आई आहे. तास जितेंद्र नेहमीच आईविषयी भरभरून बोलतो. पण आज तो आईसोबत व्यक्त झाला आहे.
जितेंद्र जोशीने लिहिले आहे कि, ‘मेरी मां का जन्मदिन है आज उसके उपलक्ष में मेरी ये भेंट मेरी और सभी की माताओं के लिए।’
” मां ”
जीव जहां जन्मा यह
पनपा जिसके गर्भागार में
क्या उसको दे पाऊं, किस विधि
प्रकट करूं आभार मैं
हाथ पकड़ सिखलाती जो
पहले अक्षर का पहला ज्ञान
शब्द कौनसे लाऊं नए मैं
कासे करूं उसका सम्मान
थामे उंगली चले चली जो
चाल मुझे जिसने बतलाई
जहां जहां मुझको जाना था
बिन पूछे जो साथ में आई
मात पिता की सेवा भी की
बंधु बहन का धर्म निभाया
सबके कारण कष्ट किए पर
कभी नहीं उसको जतलाया
अपनी रोटी स्वयं कमाई
मान कमाया नाम कमाया
मेहनत का आभूषण पहनो
दया रखो, यह मंत्र सिखाया
चाहे जितना नमन करूं मैं
चाहे जितनी बार कहूंगा
प्यार तेरा लौटाने जितने
जतन करूं पर कर ना सकूंगा
मां आखरी चाह मेरी है
इसको भी तुम पूरी करना
जब तक मेरी आंख है ज़िंदा
खुद को उससे दूर ना करना
– जितेंद्र शकुंतला जोशी
आज जितेंद्र जोशीच्या आईचा वाढदिवस आहे आणि म्हणून काही खास फोटो शेयर करत त्याने कवितेच्या माध्यमातून आपले प्रेम, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्र नेहमीच त्याच्या नावापुढे शकुंतला हे नाव लावतो. हे नाव दुसरं तिसरं कुणाचं नसून त्याच्या आईचं अर्थात त्याच्या जिजीचं आहे. आईवर प्रचंड जीव असणाऱ्या जितूसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे आणि म्हणून त्याची एक साजरी आठवण रहावी अशी एक हिंदी कविता त्याने लिहून शेयर केली आहे. जितेंद्र जोशीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अनेकांनी त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post