Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव समजले; मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 20, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
176
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला एक ई मेल आला आहे. या ई मेलमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंबई पोलिसांची तडक कारवाई करत तपासात प्रगती केली आहे. चालू तपासात ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव पोलिसांना समजले आहे आणि त्यामुळे तपासाला आणखी वेग आला आहे.

Mumbai Police beefs up security outside actor Salman Khan's residence after threat email

Read @ANI Story | https://t.co/DVKNZDsfhU#SalmanKhan #Mumbai #MumbaiPolice #Maharashtra pic.twitter.com/rgyihEOosI

— ANI Digital (@ani_digital) March 20, 2023

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने ईमेल द्वारे पाठवल्याचे समोर आले आहे. सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला हा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ई मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडेच झालेल्या मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे. या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने म्हटले होते की, ‘सलमान खानला ठार करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे’. यातच आता आलेल्या धमकीनंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी ठोस पाऊल उचलत या प्रकरणी कलम ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ या अन्वये प्रकरण दाखल केलं आहे. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली आहे.

सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रोहित गर्गने ई मेलमध्ये लिहिलं की, ‘गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचं बंद करायचं असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचं असेल तर तसं कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवलं आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ’. मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ सुरक्षा प्रदान केली असून त्याच्या घराभोवतीची सुरक्षाही वाढवली आहे.

Tags: ANIDeath ThreatsSalman KhanTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group