Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वेडात मराठे..’च्या टीमने घेतला जोतिबाचा आशीर्वाद; पंगतीत बसून चाखला अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vedat Marathe Team
0
SHARES
99
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचे कोल्हापुरात चित्रीकरण सुरु आहे. या निमित्त चित्रपटातील कलाकारांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर पंगतीत बसून जेवण्याचा आनंद देखील लुटला आहे. या चित्रपटात गायक डॉ. उत्कर्ष शिंदे हा सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारतो आहे. शूटिंगच्या निमित्ताने उत्कर्ष आणि त्याचे सहकालाकर अनेक अविस्मरणीय क्षण एकत्र घालवत आहेत. त्यापैकीच हा एक असे म्हणत एक व्हिडिओ शेअर करत उत्कर्षने चाहत्यांसह पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

उत्कर्षने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी ‘वेडात मराठे..’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या कपाळी लागलेला गुलाबी गुलाल सांगतोय कि त्यांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे. तसेच यानंतर जमिनीवर पंगतीत बसून ते जेवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चं आमचं शूटिंग कोल्हापूरमध्ये करत असताना आमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर सर्व टीम मेंबर्स ला “दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थान”ला घेऊन गेले. त्यांच्या दिग्दर्शनात एक नट म्हणून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये. एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारांसोबत वेळ घालवता येतोय, प्रवीण तरडे दादा, सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र’.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

पुढे, ‘ह्या सर्वांसोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनीवर पंगतीत बसून जेवता आलं. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घडतायत कि माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या. एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वांकडून. तुम्हा सर्व रसिक मायबापाच्या आशीर्वादामुळे हे शक्य होत आहे’. उत्कर्षची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याचे चाहते या कलाकरांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Tags: Hardeek JoshiInstagram PostJay DudhaneMahesh Manjrekarpravin taradeSiddharth JadhavUtkarsh ShindeVedat Marathe Veer Daudle SaatViral VideoVishal Nikam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group