हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने विश्वात ऍक्शन डिरेक्टर अशी ओळख निर्माण करणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने मराठी सिनेविश्वात पदार्पण केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला गोलमाल, सिंघम, सिंबा, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे हटके आणि जबरदस्त ऍक्शन सिनेमे दिल्यानंतर आता मराठी प्रेक्षकांसाठी हे मोठं सरप्राईज घेऊन रोहित शेट्टी सज्ज झाला आहे. आतापर्यंत रोहित शेट्टीने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. पण पहिल्यांदाच मराठी सिने इंडस्ट्रीत तो तरुणाईचे लक्ष वाढणारा सिनेमा घेऊन आला आहे. ज्याचा ट्रेलरसुद्धा रिलीज झाला आहे.
रोहित शेट्टीने ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन एकच दिवस झाला असला तरीही रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणून जोरदार चर्चा रंगली आहे. रोहित शेट्टीने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत ही माहिती दिली आहे. यामध्ये त्याने लिहिलंय कि, ‘मी मराठी चित्रपटाची कधी निर्मिती करणार..? असा प्रश्न मला माझ्या मराठी चाहत्यांकडून विचारला जायचा. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मराठीतील पहिलाच चित्रपट मी घेऊन आलो आहे.’
रोहित शेट्टीचा ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा चित्रपट जीवनातले महत्वाचे टप्पे घेऊन आला आहे. यामध्ये शाळेत, कॉलेजमध्ये येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत होणार आपली घडण, ज्यामुळे मिळतं आयुष्याला वळण अशी आपलीच गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन विहान सुर्यवंशी यांनी केलं आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटात जितेंद्र जोशी, करण किशोर आणि तेजस्वी प्रकाश यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सोबतच वनिता खरात, प्रसाद जवादे हे कलाकारदेखील अन्य मात्र महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post