Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मुंडावळ्या, वरमाला अन् मंगलाष्टक वन्स मोर; वंदना गुप्तेंनी वयाच्या 70’व्या वर्षी केलं पुन्हा लग्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 22, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vandana Gupte
0
SHARES
389
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणाने प्रेक्षकांना भरभरून आनंद देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते हे एक मोठे नाव आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी विविध ढंगाच्या भूमिका साकारल्या आणि गाजवल्या. त्यांचा प्रत्येक वयोगटात चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या वंदना गुप्ते यांनी वयाच्या ७० व्या वर्ष पुन्हा लग्न केल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी हि माहिती दिली आणि चाहत्यांना धक्काच लागला.

View this post on Instagram

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

त्याच झालं असं,कि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या लग्नाचा नुकताच ५०’वा वाढदिवस झाला. वंदना यांनी ५० वर्षांपूर्वी शिरीष गुप्ते यांच्याशी लग्न केले. संसाराची ही ५० वर्षे अशी सरली की दोघांनाही कळले नाही. मग या सुखी संसाराची ५० वर्षे साजरी करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांशी लग्न केलं, अतिशय छोटेखानी विवाह सोहळा पार पडत त्यांनी एकमेकांशी पुन्हा लग्न गाठ बांधली. आपल्या कुटुंबीयांच्या साक्षीने वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत इनिंग सुरु ठेवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

या दरम्यानचे काही क्षण वंदना यांनी सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले कि, ‘आमच्या लग्नासाठी माझी वहिनी अमेरिकेहून आली, माझी भाची कॅनडाहून आली, माझी लेक स्वप्ना वेस्ट इंडिजवरून आली. या खास दिवशी हे सगळे आमच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनी घरीच लग्नाची तयारी केली जेणेकरून आम्ही दोघांना ते अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले. सर्वाधिक आनंद याचा होता की आमची मुलं आमच्या लग्नाला हजर होती. आमच्या आनंदात सहभागी होऊन आमचा हा दिवस खास बनवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार’. वंदना आणि शिरीष यांच्या पुनर्विवाहासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. शिवाय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहते विविध कमेंट करीत त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressVandana GupteViral VideoWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group