हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल राहण्यासाठी जवळपास सर्व मालिका मनोरंजनाचा एक टप्पा गाठताना दिसतात. यामध्ये स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या घोडदौडीत नेहमीच पहिली राहिली आहे. ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘ठरलं तर मग’ अशा अनेक विविध मालिका आणि त्यांची कथानकं प्रेक्षकांचे मन जिंकून टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० मध्ये जागा मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने टीआरपीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र आता पुन्हा एकदा ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने आपले प्रथम स्थान मिळवले आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर, आता ही मालिका मनोरंजनात्मक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील मुख्यपात्र अरुंधती अर्थात आई तिच्या नव्या संसारात रमण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या लग्नामधून जे सुख अरुंधतीला मिळाले नाही ते आशुतोष सोबत झालेल्या लग्नातून तिला मिळताना दिसत आहे. अरुंधती हे पात्र प्रेक्षकांचे अत्यंत आवडते पात्र आहे. त्यामुळे अरुंधतीला आनंदी पाहून प्रेक्षकही आनंदी होताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे अरुंधतीला नेहमीच त्रास देणारा तिचा पूर्वपती म्हणजेच अनिरुद्ध तिच्या लग्नाने अत्यंत अस्वस्थ आहे. यामुळे त्याच्या आणि संजनाच्या नात्यात कटूता निर्माण होताना दिसत आहे. परिणामी लवकरच त्या दोघांचे भांडण टोकाला जाऊन त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मालिकेत पुढील कथानकाला एक वेगळे वळण मिळू शकते
तर टीआरपीच्या शर्यतीत दुसरा क्रमांक गाठणारी ‘ रंग माझा वेगळा ‘ हि मालिका अत्यंत धक्कादायक वळणावर येऊन ठेपली आहे. हि मालिका काही वर्ष पुढे सरकल्याचे दाखवण्यात आले आहेत. नुकताच कार्तिक त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून तुरूंगातून परतला आहे. पण त्याची पत्नी दीपाने त्याला तुरुंगात डांबल्याचा त्याचा गैरसमज आता बदल्याच्या भावनेत परिवर्तित झाला आहे. ज्यामुळे कार्तिकला यासाठी दीपाला शिक्षा द्यायची आहे. ज्यासाठी तो कोणतेही टोक गाठायला तयार आहे. हि मालिका देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Discussion about this post