हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य संबंधित तक्रारींनी त्रासलेले आहेत. अलीकडेच त्यांचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान त्यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अमिताभ यांनी आपले हेल्थ अपडेट देताना ‘वेदना काही थांबायचे नाव घेईनात’ असे सांगितले आहे. सध्या ते आपल्या घरीच विश्रांती घेत लवकर बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका त्रासातून बाहेर येण्याआधीच अमिताभ अन्य एका वेदनादायक समस्येने त्रासले आहेत. ज्याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन नेहमीच ब्लॉग मधून व्यक्त होत असतात. याहीवेळी त्यांनी ब्लॉगमधून आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट देताना आरोग्याशी संबंधित नव्या समस्येचा उल्लेख केला आहे. अमिताभ बच्चन यांनी हेल्थ अपडेट देणाऱ्या आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘बरगड्यांमध्ये दुखणे सुरूच आहे, परंतु पायाच्या बोटांच्या समस्येमुळे बरगड्यांपेक्षा जास्त त्रास होत आहे. तेथे फक्त कॉलसच नाही तर त्याखाली एक फोडही आला आहे. ज्यामुळे त्रास आणखी वाढला आहे’.
पुढे लिहिलंय, ‘यात थोड्याशा निष्काळजीपणाने खूप त्रास होऊ शकतो. यासाठी कोमट पाण्यात पाय बुडवले, पण तो उपायही कुचकामी ठरला. एवढा भयानक त्रास मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता’. अमिताभ यांनी उल्लेख केलेल्या कॉर्न आणि कॉलस हा त्वचेचा एक पॅच आहे. जो शरीरावर कुठेही वाढण्याची शक्यता असते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे कॉर्न कॉलस केवळ पायाच्या तळावरच दिसून येतात. अनेकदा तो खडबडीत पॅच असतो. सामान्य भाषेत याला ‘नखे किंवा गाठ’ असे म्हणतात. यातून वेदना होत नाहीत. मात्र संसर्ग झाल्यास त्रासदायी ठरते.
Discussion about this post