Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऋण, आभार आणि माफी!! परखड बोलणारी कंगना वाढदिवशी नरमली..?; व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 23, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kangana Ranaut
0
SHARES
67
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौतचा ३६ वा वाढदिवस आहे. कंगनाने उदयपूरमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला आहे आणि यावेळी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या परखड आणि मारक बोलण्यामुळे चर्चेत राहणारी कंगना आज तिच्या सौम्य स्वरूपात नेटकऱ्यांना प्रभावित करताना दिसली. वाढदिवसानिमित्त तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने आपल्या आई- वडील, गुरु, मित्र, चाहते यांचे आभार मानले आहेत. इतकेच नव्हे तर तिने आपले शत्रू आणि टीकाकार यांचेही ऋण व्यक्त केले आहेत. याशिवाय त्या सगळ्या लोकांची माफी मागितली आहे ज्यांची मनं तिच्या बोलण्याने दुखावली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कंगना रनौतने खूप सुंदर अशी हिरव्या आणि आणि गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे. यावेळी तिने गळ्यात सोन्याचा नेकलेस, कानातले डूल परिधान केले आहेत. शिवाय कपाळावर लाल टिकली अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा भारतीय पेहराव ठरतो आहे. तसेच या कंगनाने बोलताना आपल्यामुळे दुखावलेल्यांची माफी मागितली आहे. आई, वडील आणि गुरुवर्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय शत्रू, टीकाकार यांचाही उल्लेख करत तिने ऋणी राहीन असे म्हटले आहे. पाहुयात काय म्हणाली कंगना..

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कंगना रनौत म्हणते आहे कि, ‘आज माझ्या वाढदिवसाचे निमित्त मी माझे आई- वडील, माझी कुलदेवी अंबिका माता, माझे अध्यात्मिक गुरु श्री सद्गुरू आणि श्री स्वामी विवेकानंद, माझे सर्व शुभचिंतक, सहकलाकार ज्यांच्यामुळे मला इतकं यश मिळालं, माझं कुटुंब, मित्र, चाहते या सर्वांसाठी आभार व्यक्त करते आणि माझे शत्रू ज्यांनी मला आजपर्यंत कधीच आराम करू दिला नाही. मला लढायला शिकवलं, मला संघर्ष करायला शिकवलं त्यांचीसुद्धा मी आभारी आहे. मित्रांनो माझी विचारसरणी, आचरण आणि विचार फार सरळ आहेत. मला सगळ्यांचं भलं होताना पहायचं आहे आणि म्हणून मी कधी कोणत्या विषयासंदर्भात कुणासाठी काही बोलले असेन आणि त्यांना याचं दुःख झालं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. मला वाटतं श्रीकृष्णाच्या कृपेने मला फार सौभाग्यपूर्ण जीवनप्राप्ती झाली आहे आणि माझ्या मनात सर्वांसाठी फक्त स्नेह आणि सुविचार आहे. कुणासाठीही माझ्या मनात कोणतीही दुर्भावना नाही आहे..जय श्री कृष्ण!!’

Tags: Birthday Special PostBollywood ActressInstagram PostKangana RanautViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group