हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा बहुप्रतीक्षित ‘बवाल’ हा नवाकोरा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी घोषणा केल्यापासून हा चित्रपट अत्यंत चर्चेत आहे. साजिद नाडियादवाला आणि नितेश तिवारीची जोडी ‘बवाल’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटातील वरुण आणि जान्हवी यांची फ्रेश जोडी हा चर्चेचा विषय ठरते आहे.
National Award-Winners #SajidNadiadwala & @niteshtiwari22 are back with #BAWAAL. Watch their epic creation on 6th October 2023 in theatres near you!
Starring @Varun_dvn & #JanhviKapoor @earthskynotes @ashwinyiyer @WardaNadiadwala
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) March 22, 2023
मीडिया रिपोर्टनुसार, आगामी चित्रपट ‘बवाल’ हा एक रोमँटिक पिरियड ॲक्शन ड्रामा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये VFX वापरण्यात आल्याने तो आणखीच आकर्षक आणि लक्षवेधी ठरणार आहे. असेही सांगितले जात आहे कि, ‘बवाल’ हा चित्रपट अभिनेता वरुण धवनच्या सिने विश्वातील कारकीर्दीतला अत्यंत महागडा चित्रपट आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियादवाला यांनी ‘बवाल’ची निर्मिती केली आहे आणि अर्थस्काय पिक्चर्सची सह-निर्मिती आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार होता. मात्र VFX मधील काही समस्यांमुळे याप्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी चित्रपट ‘बवाल’ ही एक प्रेम कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे देशात आणि देशाबाहेरील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा तसेच भारतातील काही ठिकाणी चित्रपटातील मुख्य सीन्सचे चित्रीकरण करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, या चित्रपटाचे ॲक्शन दिग्दर्शक आणि स्टंट मॅन हे जर्मनीतून नेमण्यात आले होते. तसेच या चित्रपटाच्या क्रूमध्ये ७०० हून अधिक लोकांचा समावेश होता. या चित्रपटाचे VFX आणि फ्रेश जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.
Discussion about this post