हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीला ‘परिणिता’, ‘मर्दानी’ यांसारखेदर्जेदार चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन झालं आहे. या दुःखद वार्तेने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आज शुक्रवार, दिनांक २४ मार्च २०२३ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान काळाने घाला घातला आणि त्यांचे निधन झाले.
Filmmaker Pradeep Sarkar, known for making films like Parineeta, Helicopter Eela and Mardaani, passes away. His funeral will be today at 4 pm in Santacruz.
(Pic source: His Instagram handle) pic.twitter.com/Gz9THr3n9k
— ANI (@ANI) March 24, 2023
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी आजतागायत बॉलिवूड सिने जगताला एकापेक्षा एक हिट कलाकृती दिल्या आहेत. विविध ढंगाच्या विविध धाटणीच्या कथानकाचे चित्रपट प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केले आहेत. ‘परिणीता’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘हेलिकॉप्टर इला’, ‘मर्दानी’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट.
Terrible news to wake up to. Rest in peace Dada. Thank you for the love and for making me a small part of your life. Will miss you. #PradeepSarkar pic.twitter.com/bFxwm8iNqI
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) March 24, 2023
‘मर्दानी‘ या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी हि मुख्य भूमिकेत होती आणि हा चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रदीप सरकार यांनी २००५ साली सैफ अली खान आणि विद्या बालन अभिनित ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच चित्रपटांबरोबर अनेक म्युझिक व्हिडीओचेदेखील त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
The news of Pradeep Sarkar’s demise, ‘Dada’ to some of us is still hard to digest.
My deepest condolences 💐. My prayers are with the departed and his family. RIP Dada 🙏— Ajay Devgn (@ajaydevgn) March 24, 2023
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन बॉलिवूड सिने जगतासाठी न पचणारा धक्का आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या पार्थिवावर आजच मुंबईतील निवासस्थानी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Deeply saddened to know about the sudden demise of #PradeepSarkar. Dada, apart from being brilliant was kind, gentle & had a great sense of humour! It was a learning experience to work with him in #LagaChunriMeinDaag. My heartfelt condolences to the family! Om Shanti! 🙏🕉 pic.twitter.com/TzOGdnLplz
— Anupam Kher (@AnupamPKher) March 24, 2023
सरकार यांच्या निधनाची बातमी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांकडून प्रसारित केली जात आहे. प्रदीप सरकार यांच्या निधनानंतर बॉलिवूड सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अनुपम खेर, अभिषेक बच्चन, अजय देवगण, हंसल मेहता, राजीव खंडेलवाल, स्वानंद किरकिरे आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी सरकार यांच्या निधनावर शोकपूर्ण ट्विट शेअर केले आहेत.
Discussion about this post