हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिका तसेच हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचे निधन झाल्याचे हे वृत्त आहे. अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचे नाव हरमिंदर सिंग असे असून मुंबईतील राहत्या घरी बाथरूम मध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. यामुळे त्यांचा मृत्यू संशयाच्या सुईचे टोक गाठतो आहे. या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री निलू कोहली यांच्यावर पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rest in peace Paaji🙏🙏
The excitement of bringing u Ur favourite pickle will be lost forever….
To my dear friend #NiluKohli, wish I could be there for u right now….
Stay strong, Rab Rakha🙏🙏 pic.twitter.com/Be2H7ciJt4— ONLY ONE (@SheilaSandhu) March 25, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री निलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचा मृतदेह शुक्रवारी मुंबईतील राहत्या घराच्या बाथरूममध्ये आढळून आला. दिवसाच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र दुपारी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर जेव्हा ते बाथरूममध्ये गेले तेव्हा तिथेच कोसळून पडले असे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे यावेळी निलू कोहली या घरात नव्हत्या. हरमिंदर सिंग आणि त्यांचा एक नोकर केवळ घरात होते. यामुळे ही बाब नोकराच्या लक्षात येताच त्याने बाथरूमकडे धाव घेतली. तोपर्यंत हरमिंदर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. हरमिंदर यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नीलू कोहली यांचा मुलगा परदेशी असल्याने हरमिंदर यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १.३० वाजता ही घटना घडली. सकाळी ते गुरुद्वारात गेले होते आणि परतल्यावर फ्रेश होण्यासाठी म्हणून ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. यावेळी त्यांच्या घरातील मदतनीस जेवणाची तयारी करत होता. बराच वेळ हरमिंदर यांचा आवाज न आल्याने ते झोपले असावे असा अंदाज त्याने लावला. जेवणासाठी त्यांना उठवायचं म्हणून मदतनीस बेडरूममध्ये गेला आणि त्याने पाहिलं कि बाथरूमचा दरवाजा उघडाच आहे. दरवाजा बंद करण्यासाठी पुढे गेला असता त्याला हरमिंदर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे समजले. यानंतर त्याने निलू यांना फोन केला आणि हरमिंदर यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
Discussion about this post