हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर नागराज पोपटराव मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने ही संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करत आहे. यानिमित्त ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने येथील पोलिसांची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधून वेळ घालवला आहे.
‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट मुळातच फार वेगळ्या शीर्षकासह उत्सुकता घेऊन आला आहे. या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या भूमिका. तसेच चित्रपटातील डाकू गॅंगसाठी नेमलेले कलाकार हे आसपासच्या गावातील कलाकार आहेत. शिवाय चित्रपटात रिअल लाईफ पोलिसांनी काम केले आहे. त्यामुळे चित्रपटाला वास्तविकतेचा पुरेपूर टच आहे.
सध्या या चित्रपटाच्या टीमने महाराष्ट्र दौरा सुरु केला असून चंद्रपूरमधील पोलिसांची भेट घेतली आहे. यावेळी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांसोबत मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी संवाद साधला. इतकेच नव्हे तर या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना बटालियनने खूप मजा केली आणि टाळ्या, शिट्यांच्या गजरात दादसुद्धा दिली.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे स्वतः एका तडफदार आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेते सयाजी शिंदे हे या चित्रपटात जंगलातील डाकुच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर खमंग बिरयानी मेकरच्या रूपात आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिघांचाही कधीही न पाहिलेला अंदाज आपल्याला पहायला मिळणार आहे.
Discussion about this post