Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेत्याने चक्क साडी नेसून केलं फोटोशूट; नेटकरी म्हणाले, ‘आता भाऊ म्हणू कि दीदी..?’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 27, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Vijay Varma
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल फॅशन बद्दल बोलायचं झालं तर रणवीर सिंग, उर्फी जावेद यांची नाव सर्रास येतात. कारण यांच्या फॅशनला अजूनतरी तोड निर्माण झालेली नाही. ट्रोल होऊदेत नाहीतरी आणखी काही त्यांची फॅशन काय बदलत नाही. अशातच आता बॉलिवूड अभिनेता विजय वर्माने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे. जे पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विविध चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका करूनही विजय वर्माने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याला आणि त्याच्या फॅशनला फॉलो करतो. पण यावेळी विजयने केलेली फॅशन फॉलो करायची कि नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rimzim Dadu (@rimzimdaduofficial)

अभिनेता विजय वर्माने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये विजय चक्क साडीमध्ये दिसतो आहे. होय. या फोटोशूटसाठी विजय वर्माने काळ्या आणि लाल रंगाची क्लासिक मेटल साडी परिधान केलीय. या फोटोंसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तरलतेने आपल्या स्वतःच्या जगाच्या दृष्टीकोनातून, आम्ही कोणत्याही बंधनांचं पालन करत नाही. ‘आर्ट इन मोशन’ सादर करत आहे, एक कथा जी ऋतू, लिंग किंवा क्षणभंगुर फॅशन ट्रेंडच्या सीमा ओलांडते. अत्यंत अष्टपैलू विजय वर्मा एक अभिनेता ज्याला कोणत्याही भूमिकेत मर्यादित ठेवता येत नाही’. विजयचं हे नवं फोटोशूट अनेकांना आवडलं आहे तर अनेकांनी यावर टीकांची बरसात केली आहे.

खरंतर या फोटोशूटमधून विजयने स्त्री – पुरुष समानता दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. यावर उर्फी जावेदने कमेंट करताना म्हटलंय कि, ‘हि फॅशन पूर्णपणे जादुई आहे’. तर एका चाहत्याने म्हटलंय कि, ‘तू आमचे मन जिंकले आहे आणि तू सर्वात छान अभिनेता आहेस’. तर एका नेटकऱ्याने विजयच्या लूकबाबत बोलताना म्हटले आहे कि, ‘भाऊ.. तू रेखासारखा दिसतोयस.. प्लिज आता अमिताभकडे जाऊ नको’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘आता भाऊ बोलू कि दीदी..?’ तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘आता अनफॉलो करतोय.. बरा झालास कि परत फॉलो करेन’. याशिवाय आणखी एकाने विजयच्या केसांच्या निळ्या कलरवर कमेंट करत म्हटलंय, ‘होळीनंतर अंघोळ केली नाहीस का काय..? अजूनही केस निळेच आहेत’.

Tags: bollywood actorInstagram PostSocial Media CommentsVijay VermaViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group