Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

झी मराठीच्या ‘चंद्रविलास’ मालिकेसाठी बॉलिवूडच्या गायिकेने गायलं शीर्षकगीत; ऐकताच येईल अंगावर काटा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 28, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chandravilas
0
SHARES
343
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत झी मराठीवरील जवळपास सर्व मालिकांच्या शीर्षकगीतांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. यामध्ये अगदी हॉरर मालिकांचा देखील समावेश आहे. ‘असंभव’, ‘ग्रहण’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘ती परत आलीये’ अशा मालिकांच्या शीर्षकगीतांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर आता झी मराठीच्या हॉरर मालिकांमध्ये ‘चंद्रविलास’चा समावेश झाला आहे. भय इथले संपत नाही अशी टॅगलाईन असलेली हि मालिका नुकतीच सुरु झाली असून याचे शीर्षक गीत एक थरार निर्माण करणारे आहे. या शीर्षक गीताचे आकर्षण असे कि हे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेने गायले आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आजतायत भय निर्माण करणारी अनेक शीर्षक गीते आपण ऐकली असतील. पण या शीर्षक गीतातील ओढ काहीशी वेगळीच आहे. ‘चंद्रविलास’ या मालिकेच्या गुढमयी कथानकाप्रमाणेच त्याचे हे शीर्षक गीत देखील अनामिक गूढ आणि रहस्य निर्माण करते आहे. ‘चंद्रविलास’ या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच थरार निर्माण झाला. मुख्य म्हणजे या शीर्षक गीताचे आकर्षक असे कि, ‘चंद्रविलास’चे टायटल ट्रॅक बॉलिवूड सिनेविश्वातील सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने गायले आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुनिधी चौहान आपल्याला शीर्षकगीत गाताना दिसते आहे. इतकेच नव्हे तर या शीर्षकगीताचा अनुभव शेअर करताना तिने मालिकेच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘चंद्रविलास’ या मालिकेचे हे भय निर्माण करणारे शीर्षकगीत अमोल पाठारे यांनी लिहिले आहे. तर प्रणव हरिदास यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. ‘चंद्रविलास’ हि मालिका कालपासून म्हणजेच २७ मार्च २०२३ रोजी, सोमवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याचा पहिला भाग अत्यंत रहस्यमयी ठरला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकात निर्माण झाली आहे. सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे आणि या मालिकेत अभिनेता वैभव मांगले भूताची भूमिका साकारत आहेत. तसेच सागर देशमुख आणि आभा बोडस हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.

Tags: Bollywood SingerInstagram Postmarathi serialSunidhi ChauhanTitle Song ReleasedTV ShowViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group