Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या लेखिकेवर कोसळला दुःखाचा डोंगर; आधी बाबा गेले आता मातृछत्र हरपले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in फोटो गॅलरी, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोणतीही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडावी म्हणून पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकार अतोनात कष्ट घेत असतात. या कष्टाचं चीज म्हणजेच मालिकेचं यश. असंच यश आणि प्रेक्षकांचं अतोनात प्रेम स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मिळत आहे. हि मालिका अशीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहावी म्हणून त्याची लेखिका नेहमीच नवनवीन ट्विस्ट आणत असते. तिच्या आयुष्यातील वावटळ कितीही मोठं असलं तरीही ती नेहमीच मालिकेसाठी काहीतरी नवं लिहिताना दिसते. लेखिका नमिता वर्तकने ११ मार्च रोजी आपल्या वडिलांना गमावले. हे दुःख सरले नाही तोवर तिच्या आईचे २७ मार्च रोजी निधन झाले आणि तरीही नमिता मालिकेचे भाग लिहीत आहे. तिच्या दुःखाची मांडणी करणे खरंच सोपे नाही. तिच्या दुःखात सहभागी होत अभिनेते मिलिंद गवळी म्हणजेच मालिकेतील अनिरुद्ध यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलंय, ‘खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये, जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत, आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं. जे कधीच नाही दिसत, आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असत. सिरीयल चा 23 – 24 मिनिटाचा एपिसोड साठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, दिसत नाही तो लेखक’.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

‘जो रात्रंदिवस तो डोकंफोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मग परत लेखक डोकेफोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो. मिलिंद गवळी पुढे मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक यांच्या आयुष्यात आलेल्या दुःखद प्रसंगाबद्दल गोष्ट सांगतात.. लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो. पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल, उलथा पालत होत असेल तर…

View this post on Instagram

A post shared by namita vartak (@vartak.namita)

”आई कुठे काय करते“च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले. ११ मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल २७ मार्च रोजी म्हणजे १६ दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली, नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही, आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर.. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना’.

Tags: Aai Kuthe Kay KarteEmotional PostInstagram PostMilind Gawaliviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group