हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे हे त्यांच्या वैविध्यपूर्ण गायन शैलीमुळे अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. त्यांनी सुरांच्या तारा छेडाव्या आणि त्यामध्ये मग्न होऊन फक्त सुरांची साथ अनुभवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाला चाहत्यांची गर्दी होत असते. त्यांच्या मैफलींना मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकदा थक्क व्हायला होत. अशा गायकाला त्याची गायन शैली आज महागात पडली आहे. एका महोत्सवादरम्यान महेश काळे यांनी बॉलिवूडचे एक लोकप्रिय गाणे आपल्या शास्त्रीय शैलीत घोळवून गायले आणि बस्स्स.. यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी एका कार्यक्रमात ‘रोजा जानेमन’ हे गाणे गायले. पण कसे..? तर शास्त्रीय संगीताच्या पठडीत त्यांनी हे गाणे गायले आहे. खरंतर हे अनोखं फ्युजन ऐकताना बरं वाटत होत, पण ट्रोलर्सच्या कानाला मात्र खटकलंच. महेश यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर ट्रोलर्सने हल्लाबोल केलाय. ‘रोजा जानेमन’ आणि ‘हे शब्दांच्या पलीकडले..’ अशी दोन्ही गाणी मिक्स करून गायल्याने ट्रोलर्सची पुरती हटली आहे. ‘दक्षिण आणि उत्तर कधीही एक होत नाहीत.. ‘ असे म्हणत एकाने महेश काळे यांचा समाचार घेतला आहे.
इतकंच काय तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘ए बाबा रमजान सुरु असून रोजा असं गाऊन त्या रोजाची वाट लावू नको रे’. आणखी एकाने तर महेश यांच्याच शैलीत त्यांना टोमणा मारला आहे. त्यानं कमेंटमध्ये लिहिलं आहे कि, ‘हे सुरांनो थंड घ्या…’. आणखी एकाने ‘मराठी गाण्यांची मैफिल आहे की उर्दु गाण्यांची…?; असा प्रश्न विचारला आहे. आता सोशल मीडियावर चालू ट्रोलिंग पाहता या कार्यक्रमावेळी महेश यांनी ‘रोजा जानेमन’ गाताना ज्या हरकती घेतल्या त्या उपस्थित श्रोत्यांना आवडल्या नसतील का..? असा सवाल उपस्थित होतो आहे.
Discussion about this post