हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती ही नाट्य उपक्रमांपेक्षा वादविवादांमुळेच नेहमीच चर्चेत राहिली आहे. अशातच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आता बिगुल वाजले आहे. त्यामुळे २०२४ ते २०२८ या काळासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ‘आपलं पॅनेल’ या निवडणुकीत रणधुमाळीत उतरवलं आहे. ‘आपलं पॅनेल’च्या माध्यमातून मध्यवर्ती निवडणूकीसाठी १० तर मुंबई उपनगरसाठी ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
यंदा मुंबई मध्यवर्तीसाठी नवनाथ (प्रसाद) कांबळी, सुकन्या कुलकर्णी – मोने, मंगेश कदम, राजन भिसे, प्रमोद पवार, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, अनिल कदम आणि प्रभाकर वारसे या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरसाठी दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, अशोक नारकर आणि ऐश्वर्या नारकर या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया हि येत्या १६ एप्रिल २०२३ रोजी पार पडेल. मतदानाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी असणार आहे.
मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीतील विविध वादविवादांमुळे अध्याप शतक महोत्सवी नाट्य संमेलनदेखील झालेले नाही. इतकेच काय तर रंगभूमीसाठी हितवर्धक असणारे अनेक उपक्रमसुद्धा रखडले आहेत. म्हणूनच, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा एकत्रितपणे ‘आपलं पॅनेल’ उभे केले आहे. यामध्ये नाट्य निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, पडद्यामागील कलाकार, व्यावसायिक – हौशी – प्रायोगिक विभागातील लोकांचा समावेश आहे. या पॅनलचा असं दावा आहे कि, ‘२०१८ ते २०२३ दरम्यान आम्ही रंगभूमीविषयक अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत’. आता या निवडणुकीत कोण कोणावर भारी पडणार हे लवकरच कळेल.
Discussion about this post