Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

थुलथुलीत पोट.. जाडी झालीये.. प्रेग्नेंट आहेस..? काजोलच्या ‘त्या’ व्हिडिओवर ट्रोलिंगची बरसात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kajol
0
SHARES
422
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काजोल ही बॉलीवूड सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलया आहेत आणि त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट नुकताच शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोल देखील उपस्थित होती. मात्र यावेळी स्क्रीनिंग दरम्यान काजोलने परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. सोशल मीडियावर तिच्य्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर चाहत्यांपेक्षा जास्त ट्रोलर्सच्या कमेंट्स दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी त्याची पत्नी काजोलसह त्यांचा मुलगा युगदेखील उपस्थित होता. स्क्रीनिंला येताना काजोलने लाईट ग्रीन- व्हाईट कलरचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केला होता. सोबत व्हाईट जॅकेट, हातात पर्स, पायात शूज आणि गॉगलसोबत तिने लूक पूर्ण केला होता. स्क्रीनिंग दरम्यान एंटर झालेल्या काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असता प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या लूकवर, ड्रेसिंग स्टाईलवर आणि वाढत्या वजनावर नेटकऱ्यांनी मर्यादेच्या सीमा पार करत कमेंट्स केल्या आहेत. याआधीदेखील काजोल अनेकदा ट्रोल झाली आहे. मात्र यावेळी ट्रोलर्सने सर्व सीमा पार केल्या आहेत.

यावर एका नेटकऱ्याने लिहले आहे, ‘तिला कोणीतरी ड्रेस कसा घालायचा हे सांगा’. तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘या अभिनेत्रीला खरंच मेकओव्हर करण्याची गरज आहे’. तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘ही गरोदर आहे का..?’. एकाने असेही लिहिले आहे, ‘काजोल आंटी.. सगळीकडून सगळंच सुटलंय..’ तर अन्य एकाने म्हटले, ‘काय ते पोट.. काय तो ड्रेस… कुठेतरी लक्ष द्यायचं’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘तुमच्यासारख्या अभिनेत्री असले कपडे घालतात आणि तरुण पिढीला खराब करतात.. तुमच्यामुळे मुली बिघडतात आणि त्यांच्यासोबत मग चुकीचं घडत’. तर काजोलच्या चाहत्यांनी ट्रोलर्सला उत्तर देत म्हटलं आहे कि, ‘वय नावाची सुद्धा काहीतरी गोष्ट असते.. तिच्या शरीरात वयानुसार बदल होत आहेत. जे सगळ्यांमध्ये होतात’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘एक स्त्री म्हणून तिने काय घालायचं हा तिचा निर्णय आहे.. आणि मुळात उर्फी जावेदपेक्षा १०० पटीने चांगलेच कपडे तिने परिधान केले आहेत’.

Tags: Bollywood ActressInstagram PostkajolSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group