हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच एक स्वप्न नक्की असत.. ते म्हणजे स्वतःचं घर घेणं. या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होत त्या दिवशी लागणारी झोप हि फार समाधानी आणि तितकीच शांत असते. तर हेच समाधान आणि शांतता मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने मिळवलं आहे. होय. अभिनेत्री ऋतुजा बागवेने स्वतःच हक्काचं असं घर घेतलं आहे. हा आनंद तिने आपल्या चाहत्यांसह शेअर करताना इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच घराच्या किल्ल्या हातात घेतलेला एक फोटोसुद्धा शेअर केला आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने ‘न्यू होम, न्यू ऍडव्हेंचर’ असं लिहिलेलं किचैन लावून आपल्या घराच्या किल्ल्या दाखवल्या आहेत. तर या चावीमागे ऋतुजाच्या नवीन घराचा दरवाजा दिसत असून त्यावर ऋतुजा आर बागवे असं नाव दिसतं आहे. या फोटोसोबत तिने लिहिलंय, ‘फ्लॅट मिळाला आता घर बनवायचंय’. हा क्षण तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी खरंच फार अभिमानाचा आहे. ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत हा आनंद शेअर करताना नवीन घराची चावी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर खुललेला मोगरा अगदीच स्पष्ट दिसतोय. याशिवाय ऋतुजाने नवीन घरात आई बाबांचं स्वागत केलं आणि घरात गणेशपूजादेखील केली आहे. यावेळी ऋतुजाच्या आई बाबांनी तिचा पापा घेऊन कौतुक केलं आहे.
ऋतुजाने हा आनंद शेअर करणाऱ्या व्हिडिओसोबत लिहिलंय, ‘… शाळेत असताना बाबा ५रू. पॉकेट मनी द्यायचे. ३रू. खर्च करुन २रू. पिगी बँकमध्ये ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५रू. पिगी बँकमधे टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, छोटेसे त्याग, आई- बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं. घर आणि घराला घरपण देणारी माझी माणसं..’. ऋतुजाच्या आनंदात तिचा मित्र परिवार, चाहते मंडळी सारे सहभागी होत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खरंच स्वतःच्या हिंमतीवर घर घेणं हि बाब फार मोठी असते आणि हे ऋतुजाने करून दाखविल्याचा तिच्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे.
Discussion about this post