हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि तिच्या अभिनयापेक्षा जास्त आक्षेपार्ह पोस्टमुळेच चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिचा वावर हा नेहमीच लक्ष वेधून घेतो. यावेळी केतकीने अशी एक पोस्ट केली आहे जी वाचून त्याचा नेमका काय अर्थ घ्यावा हे कळेनासं झालं आहे. पण तिच्या या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे हे नक्की. मध्यंतरी केतकीने शरद पवार यांच्यावर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती आणि यामुळे तिला अटक झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरदेखील केतकी अनेकदा ‘मी सत्य बोलते आणि म्हणून टार्गेट होते’ असे बोलताना दिसली. मात्र यावेळी तिने जी पोस्ट शेअर केली आहे ती एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही.
या पोस्टमध्ये अभिनेत्री केतकी चितळेने स्वतःच्या फोटोसोबत एक मजकूर लिहिला आहे. ज्यामध्ये त, ‘मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली ७ वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मरण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल’. केतकीने या फोटोसोबत एक कॅप्शनदेखील शेअर केले आहे.
या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत. एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझ्या मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल. मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही. त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल. जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!’. केतकीच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली असून या पोस्टचा नक्की अर्थ काय आहे..? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Discussion about this post