हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुमित पुसावळे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. या मालिकेत त्याने साकारलेली बाळूमामांची भूमिका हि अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे. या मालिकेने सुमितला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
मालिका विश्वात सध्या सूमित पुसावळे हे नाव आघाडीच्या कलाकारांच्या यादीत घेतले जाते. असे असूनही सुमितसोबत एक अतिशय धक्कादायक असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याविषयी स्वतः सुमितने माहिती दिली आहे.
त्याच झालं असं कि, सुमितचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमी फॉलोवर्स असल्याचे कारण देत त्याला एका सिनेमातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे. सुमितने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं कि, ‘मी नुकतीच एका सिनेमासाठी आणि म्युझिक व्हिडीओसाठी ऑडिशन दिली होती. या ऑडिशननंतर माझी निवडही झाली. पण त्यानंतर सिनेमा आणि म्युझिक व्हिडिओच्या संबंधित लोकांनी माझं सोशल मीडिया हॅण्डल चेक केलं. ज्यावर माझे फॉलोवर्स कमी असल्याने मला त्यांनी सिनेमातून काढून टाकलं. या मला खूप धक्का बसला आणि दुःख वाटलं’.
पुढे बोलताना सुमित म्हणाला कि, ‘दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय. तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमचे सोशल मीडियावर किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूपच वाईट आहे. आता मी जास्तीत जास्त व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण आता फॉलोवर्स वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटू लागलंय’. या प्रकाराच्या उघडकीस येण्याने खरंच कलावंताच्या कलेचा दर्जा हा सोशल मीडिया तपासून ठरवला जाणे योग्य आहे का..? असा सवाल उपस्थित करत आहे.
Discussion about this post