हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टेलिव्हिजन मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा सीझन १३ चांगलाच चर्चेत राहिला. या सीजनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आणि नुकताच रविवारी या सिझनचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. यंदाच्या इंडियन आयडॉल सीजन १३’चे विजेतेपद ऋषी सिंगने पटकावले. ऋषी हा मूळ अयोध्या रहिवासी असल्याने त्याचे कौतुक करतानाउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ट्विट शेअर करत इंडियन आयडॉल सीजन १३’चा विजेता ऋषी सिंगचे अभिनंदन केले आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलं आहे कि, ‘इंडियन आयडॉल १३’ चे विजेते झाल्याबद्दल अयोध्याचा रहिवासी ऋषी सिंह याचे हार्दिक अभिनंदन! उत्तर प्रदेशसह संपूर्ण संगीत जगताला तुमच्या अतूट संगीत अभ्यासाला समर्पित केलेल्या या यशाचा अभिमान आहे. माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो, तुमची यशाची सुवर्णलक्षा अखंड चालू राहो, हीच माझी सदिच्छा!’
'Indian Idol-13' के विजेता बनने की अयोध्या निवासी ऋषि सिंह को हार्दिक बधाई!
आपकी अटूट संगीत साधना को समर्पित इस उपलब्धि पर उत्तर प्रदेश समेत पूरे संगीत जगत को गर्व है।
माँ सरस्वती की कृपा आप पर बनी रहे, आपकी स्वर्णिम सफलताओं का क्रम अनवरत चलता रहे, यही कामना है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 3, 2023
इंडियन आयडॉल सीजन १३’चे विजेतेपद मिळवल्याबद्दल ऋषी सिंगला २५ लाखांचा धनादेश, सोबत नवीकोरी कार आणि टायटल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर ऋषीला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचे कॉन्ट्रॅक्टदेखील मिळाले आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच ऋषीने आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहित केले होते.
ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी असून त्याला लहानपणापासूनच लेखन आणि गायनाची आवड होती. हीच आवड आज त्याला इंडियन आयडॉल हा ‘किताब मिळवून देण्यास जबाबदार ठरली आहे.
Discussion about this post