हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ स्टार अभिनेता किच्चा सुदीप हा अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. केवळ कन्नड सिने इंडस्ट्री नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातही त्याचे अनेक चाहते आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी राजकारणात एंट्री केल्याचे आपण पाहिले असेल. यामध्ये आता अभिनेता किच्चा सुदीपच्याही नावाचा समावेश होत आहे. ‘हिंदी राष्ट्रभाषा नाही’ असे म्हणणारा किच्चा सुदीप आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण पक्ष प्रवेशाआधीचं त्याला धमकीचं पत्र आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Amid speculations of joining BJP, Kiccha Sudeep receives threat letter
Read @ANI Story | https://t.co/h7VSii0bJr#KicchaSudeep #threatletter #BJP #Karnataka pic.twitter.com/pTFQYvmQv3
— ANI Digital (@ani_digital) April 5, 2023
कन्नड मेगास्टार किच्चा सुदीप आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना एकीकडे उधाण आले असतानाच त्याला एक धमकीचं पत्र मिळालं आहे. अभिनेता किच्चा सुदीपचा मॅनेजर जॅक मंजू याला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचं धमकी देणारं पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अभिनेत्याने एफआयआर दाखल केली असून याचा पोलिस तपास करत असल्याचे समजत आहे. मात्र भाजपमध्ये पक्ष करणार या चर्चेनंतर त्याला ही धमकी मिळल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
किच्चा सुदीप हे नाव मनोरंजन विश्वासाठी काही नवे किंवा वेगळे नाही. कारण किच्चा सुदीप त्याच्या अभिनयाइतकाच विविध वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. मध्यंतरी झालेल्या राष्ट्रभाषेवरील वादामुळे किच्चा सुदीप हे नाव नेटकऱ्यांच्या चांगलंच ध्यानी मनी बसलं आहे. यावेळी त्याने ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नाही’ असे विधान केले होते आणि या एका विधानाने संपूर्ण टॉलिवूड तसेच बॉलीवुड वादाच्या मैदानात उतरले होते.
Discussion about this post