Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Rashmika Mandanna Net Worth : रश्मिका मंदाना एका चित्रपटाचे किती रुपये घेते..? एकुण संपत्ती किती आहे जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rashmika Mandanna Net Worth
0
SHARES
2.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रॅश आहे हे काही वेगळे सांगायला नको. (Rashmika Mandanna Net Worth)

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

शिवाय पुष्पाची श्रीवल्ली होत तिने सामी सामी म्हणत विविध भाषिक प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. साऊथ सिने इंडस्ट्री सोबतच रश्मिका मंदाना आता बॉलिवूड सिने विश्वातही आपले नशीब आजमावते आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

तर सिध्दार्थ मल्होत्रा सोबत ती ‘ मिशन मजनू ‘ या चित्रपटात दिसली होती. साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनसोबत तिने ‘ पुष्पा ‘ हा चित्रपट गाजवला. या चित्रपटातील श्रीवल्ली आणि तिची अदा सगळ्यांवर भारी पडली. अनेक तरुणांची स्वप्न सुंदरी रश्मिका अलीकडेच झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात लावणी करताना दिसली होती. तिच्या लावणीने भल्या भल्यांची विकेट काढली.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

इतकचं काय तर रश्मिका मराठी सिनेसृष्टीतसुद्धा काम करायला तयार असे बोलले गेले. खरंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या सौंदर्यामुळे आणि लाईफ स्टाईलमध्ये जास्त चर्चेत असते. चित्रपट, लाईव्ह शो, जाहिरातींचे शूट, मॉडेल शूट अशा विविध माध्यमांमधून रश्मिका कमावते आणि लाईम लाईट लाईफचा आनंद लुटते. दमदार अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजाच्या जोरावर ती आताही काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर आज आपण नॅशनल क्रॅश रश्मिका मंदानाची कमाई, माध्यमे आणि जमा केलेल्या संपत्तीविषयी जाणून घेऊया. (Rashmika Mandanna Net Worth)

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका मंदाना हे मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव. गीता गोविंदम, पुष्पा यांसारखे जबरदस्त हिट सिनेमे देऊन सिने इंडस्ट्रीत घट्ट पाय रोवणारी ही अभिनेत्री दर महिन्याला साधारण ६० लाख रुपये कमावते. तर वर्षाला ८ करोडच्या आसपास तिची कमाई आहे. (Rashmika Mandanna Net Worth) केवळ अभिनयातून नव्हे, तर नृत्य, फोटोशूट यांसारख्या माध्यमात देखील ती काम करत असते. या २०२३ पर्यंतच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तब्बल ८० लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ६५ करोड रुपयांची मालकीण आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

(Rashmika Mandanna Net Worth) लक्षवेधी चेहरा, कमालीचा अभिनय आणि बिनधास्त अंदाजाच्या जोरावर रश्मिका मंदानाने आज स्वतःचं नाव एक ब्रँड प्रमाणे तयार केलं आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्याचा विचार केला की तिच्या नावाची चर्चा आपसूकच होत असते. साधारण एक सिनेमा साईन करण्यासाठी ती करोडो रुपये फी म्हणून घेते.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

अलीकडेच तिने एक चित्रपट ४ करोड रुपये फी घेत साईन केला आहे. याशिवाय रश्मिका स्टेज शो, जाहिरात, मॉडेलिंग यासाठी देखील लाखो रुपये फी म्हणून घेते. अलीकडेच सुरू झालेल्या IPL च्या मंचावर देखील रश्मिकाची उपस्थिती होती. रश्मिकाकडे Mcd, किंग फिशर, फिओना ऑईल, स्कैचर्स इंडिया, वेक फिक मॅट्रेसेस यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या जाहिराती आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका मंदानाने स्वबळावर ही संपत्ती तयार केली असून देशभरातील विविध शहरांमध्ये तिने रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे. रश्मिकाने बँगलोरमध्ये तब्बल ८ कोटी रुपयांचे आलिशान घर बनवले आहे. तर मुंबईतही तिने एक लक्झरी अपार्टमेंटची खरेदी केलेली आहे. (Rashmika Mandanna Net Worth)

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका नेहमीच ग्लॅमरस अंदाजात राहणे पसंत करते. त्यामुळे गुंतवणुकीसह ती स्वतःच्या लाईफ स्टाईलकडे देखील बारकाईने लक्ष देते. डिझायनर वेअर, आऊटफिट, हॅण्डबॅग्स, शूज, हिल्स अशा अनेक ब्रँडेड आणि महागड्या वस्तू ज्यांची किंमत ३ लाख ते ५ लाख आहे असं कलेक्शन रश्मिकाकडे आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

मुख्य म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना जितकं कमावते आणि स्वतःच्या लाईफ स्टाईल वर खर्च करते तितकीच ती सामजिक कार्यात अग्रेसर असते. अभिनेत्री रश्मिका मंदाना ही आपल्या कमाईतील काही टक्के भाग हा चॅरीटी फंड, अनाथ आश्रम, मंदिरे, तसेच NGO साठी देते. (Rashmika Mandanna Net Worth)

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

इतकेच काय तर विविध संस्थांसोबत ती स्वतः सामाजिक कार्यात भाग घेताना दिसते. तेलुगू सिने इंडस्ट्रीतून अभिनय विश्व गाजवायला सुरुवात करत आता रश्मिका बॉलिवूड पर्यंत येऊन पोहोचली आहे. हळूहळू ती यशाचा एक एक टप्पा पार करते आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहे. (Rashmika Mandanna Net Worth)

Tags: Instagram PostLifestylerashmika mandanaSouth ActressViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group