हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्यासह, अभिनयासाठी नेहमीच असते. त्यात सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताने दिसते. कधी नवं फोटोशूट, कधी नवा लूक, कधी नवा प्रोजेक्ट तर कधी आणखी काही. प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसह शेअर करत त्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही नवे फोटोशूट व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सोनाली मनमोकळ्या अंदाजाने चाहत्यांच्या मनावर रुंजी घालते आहे.
सोनाली कुलकर्णीने हे फोटोशूट सूर्यास्ताच्यावेळी केले आहे. या फोटोंसह तिने सोशल मीडियावर अतिशय लक्षवेधी असे कॅप्शन शेअर केले आहेत. यातील एका फोटोशूटसोबत तिने लिहिलंय, ‘आजूबाजूचा परिसर प्रत्येक क्षणी बदलत आहे.. एकत्र.. मीही.. इतका वेगळा, की मी पाहतोय… प्रत्येक क्षणी स्वतःला असेच बदलत आहे.’
तर आणखी एका पोस्टमध्ये फोटोंसह तिने लिहिलंय कि, ‘सूर्यास्त बोलतात याला! सडपातळ झाडांची मनगटं हलवत, सुकलेल्या सुमन-गुच्छांच्या वासाने अपमानित क्षितिज उघडते! तिथं शुक्र छातीवर हात ठेवून धडधडतो- रसिक! चंद्राची वाट पाहू नका, सुवर्णाच्या वर्खात गुंफलेल्या वासनेला अर्थ देऊ नका… नाहीतर बघ अंधाराचा फेस शोषून घेण्यासाठी उगवणारा सूर्यास्त!’
सोनालीचे हे फोटोशूट पाहून नेटकरी देखील निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. सोनालीच्या फोटोंमध्ये ढळणारा सूर्य आणि प्रखरतेकडून सौम्य झालेली त्याची लाल तांबूस किरणं लक्ष वेधून घेत आहेत. मनाला अतिशय शांत करणारे हे दृश्य आणि त्यासोबत सोनालीचे असीम सौंदर्य टिपलेले हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांनी म्हटलं आहे कि, ‘सूर्यास्त सुंदर असला तरीही त्याला कोण पाहतंय.. आम्ही तर फक्त तुला पाहत आहोत’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तू सूर्याजवळ जाऊ नकोस.. त्याला तुझी प्रखरता सोसणार नाही’.
Discussion about this post