हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात खणखणीत चालणारं नाणं म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारा हा अभिनेता नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रितेशचा ‘वेड’ चित्रपट आला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला. रितेश देशमुख एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, मुलगा, नवरा, बाबा आणि भाऊ आहे. रितेश कितीही कामात व्यस्त असला तरीही आपली नाती जपण्यासाठी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी तो करतो. खऱ्या अर्थाने तो एक फॅमिली मॅन आहे. आज रितेशने त्याच्या धाकट्या भावाच्या वाढदिवसाची खास पोस्ट शेअर केली आहे आणि यावेळी त्याने बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
रितेश देशमुखचा जन्म राजकीय घराण्यातला. त्याचे वडील दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र रितेश हाडाचा कलाकार निघाला त्यामुळे त्याने आवड जोपासत मनोरंजन विश्वाची वाट धरली. तर त्याचा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असे दोघेही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत. आज रितेश देशमुखचा धाकटा भाऊ काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याने आवर्जून एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट रितेशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
यामध्ये त्याने दोन्ही भावांसोबतचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये तरुणपणातला फोटो शेअर केला आहे. मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख यांच्यासोबतचे हे फोटो शेअर करत रितेशने लिहिले आहे कि, ‘माझा लाडका धीरज देशमुख. आम्ही कायमच तुझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला असू. तुझी ढाल म्हणून… वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा यंदाचा वाढदिवस चांगला जावो. तुम्ही असेच चांगले काम करत राहा आणि पप्पांना तुझा अभिमान वाटेल असंच रहा’.
Discussion about this post