हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड आणि हॉलीवुड सिनेविश्व गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा- जोनास अलीकडेच तिचा पती निक जोनास आणि लेक मालती- मेरीसोबत भारतात दाखल झाली आहे. नीता अंबानी यांच्या कल्चरल प्रोग्रामनंतर प्रियांकाने तिच्या लेकीसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे, प्रियांका आणि मालती गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा चांगलाचं समाचार घेतला आहे.
भारतात आल्यापासून प्रियांका, तिचा पती निक आणि लेक मालती हे प्रचंड चर्चेत आहेत. आधी अंबानींच्या NMACC च्या उद्घाटन सोहळ्यातील हजेर, मग प्रियंकाच्या ‘सिटाडेल’ या आगामी सीरिजचे स्क्रीनिंग आणि त्यानंतर आता सिद्धिविनायकाचे दर्शन. या वायरल व्हिडिओत आपण पाहू शकता की, प्रियांका तिच्या लेकीसोबत आणि टीमसोबत गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे. मंदिरातील पंडित मंत्रोच्चारण करत प्रियांका आणि मालतीला देवाचं गंध लावत आहेत. सोबतच तिच्या माथ्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देत आहे. बराच वेळ हि मंडळी देवाच्या गाभाऱ्यात उभी आहेत. फोटोशूट सुरु आहे, व्हिडीओ सुरु आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत्याच चाहत्यांनी तर पसंती दर्शवली. मात्र अन्य नेटकऱ्यांनी प्रियांकाला मंदिरात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर आक्षेप घेतला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मंदिर प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, ‘अन्य लोकांना जर सामान्य ट्रीटमेंट मिळत असेल तर मंदिरात आलेल्या प्रियांकाला व्हीआयपी ट्रीटमेंट कशाला..?’ तर अन्य एकाने म्हटलंय, ‘सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर फोटो काढायला मनाई आहे. तर मग सेलिब्रिटींना गाभाऱ्याच्या आत फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी मंजुरी कुणी दिली..?’ तसेच आणखी एकाने म्हटले, ‘प्रियांका चोप्रा मंदिरात आली म्हणून सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने त्यांचे नियम धाब्यावर बसवले का..?’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं कि, ‘आम्हाला फार आनंद झाला हे पाहून की, देवाच्या दरबारात व्हीआयपी लोकांसाठी एक वेगळी ट्रीटमेंट आहे, तर सामान्य माणसांना धक्काबुक्की करून एक सेकंदसुद्धा धड दर्शन घेऊन दिले जात नाही’.
Discussion about this post