Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भाईगिरी.. भाऊबंधकी.. राडा.. ‘आपला पॅटर्नच वेगळा..’; ‘त्या’ खास फोटोसाठी उत्कर्षने दिलं हटके कॅप्शन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Utkarsh Shinde
0
SHARES
166
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळते आहे. या चित्रपटांत अत्यंत तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असून मराठमोळ्या मावळ्यांच्या यशोगाथेवर आधारित आहे आणि या चित्रपटात अभिनेता, गायक, एंटरटेनर उत्कर्ष शिंदे एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला उत्कर्ष विविध पोस्ट शेअर करत नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो आणि याहीवेळी त्याने अशीच एक पोस्ट शेअर करताना लिहिलेलं हटके कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

अभिनेता उत्कर्ष शिंदे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील कलाकार पहायला मिळत आहेत. ज्यामध्ये विशाल निकम, जय दुधाणे, प्रवीण तरडे, विराज मडके आणि उत्कर्ष शिंदे स्वतः दिसतो आहे. हा फोटो जिममध्ये कसरत केल्यानंतर क्लिक केलेला आहे हे त्यांच्याकडे पाहून समजतंय. हा फोटो शेअर करताना उत्कर्षने त्याच्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘आपला पॅटर्नच वेगळा हाय, आपण तोडत नाही जोडतो’. यासोबत त्याने मैत्री, भाईगिरी, भाऊबंधकी, धिंगाणा, राडा, जोशअसे हे हटके हॅशटॅग जोडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

उत्कर्षने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणाऱ्या कलाकारांच्या शरीरयष्टीकडे पाहून चित्रपटासाठी ते घेत असलेली मेहनत अगदी स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटात अभिनेता उत्कर्ष शिंदे हा सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या कोल्हापूर येथे सुरू आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, जय दुधाणे, सिद्धार्थ जाधव, विराज मडके यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार झळकणार आहे.

Tags: Instagram Postmarathi actorUtkarsh ShindeVedat Marathe Veer Daudle SaatViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group