हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रत्येक घराघरात आवडीने पाहिला जातो. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत असा हास्यजत्रेचा भला मोठा चाहता वर्ग आहे. या हास्य जत्रेतील कोहली फॅमिली तर प्रत्येक कुटुंबाचा एक भाग झाली आहे.
प्रत्येक वाक्यामागे ली लावून हशा पिकवणारे आणि प्रेक्षकांना खदाखदा हसवणारे हे कुटुंब सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसते. या फॅमिलीच्या मॅडनेसची भुरळ आता ऑस्ट्रेलियन खेळाडूलादेखील पडली आहे. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या एका ऑस्ट्रेलियन खेळाडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो कोहली फॅमिलीवर बनवलेल्या मजेशीर गाण्यावर रील बनवताना दिसतोय.
हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीचं धमाल स्किट सगळ्यांचंचं फेव्हरेट आहे. यामध्ये प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर मिळून प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पडतात. कोहली फॅमिलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर मुंबई इंडियन्समधील ऑस्ट्रेलियन खेळाडू रायली मेरिडिथनेसुद्धा हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीच्या मजेशीर अंदाजात एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये तो शेवटी ‘मी रायली अवली कोहली’ असं म्हणताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर रायली मेरिडिथचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्याला चांगली पसंती देत आहेत. मुख्य म्हणजे या व्हिडीओवर नम्रता संभेरावनेसुद्धा कमेंट केली आहे. रायली मेरिडिथचा हा कोहली अंदाज पाहून कोहली फॅमिलीची मेंबर पावली अवली कोहली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेरावला हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओवर तिने हसण्याचे व हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
Discussion about this post