हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘यंतम्मा’ हे गाणं सोशल मीडियावर रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यात अभिनेता सलमान खानसोबत साऊथचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, स्टार आणि काही टी.व्ही सेलेब्स थिरकताना दिसले आहेत. या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार हवा सुरु आहे. असे असताना आता सलमानचा लुंगी डान्स अनेकांना खटकल्याचे समोर आहे आहे. मुख्य म्हणजे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करताना अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत आणि त्यामुळे दाक्षिणात्य परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप लावला जात आहे.
सलमानच्या ‘यंतम्मा’ या गाण्यामध्ये लूंगी एखाद्या प्रॉपर्टीसारखी वापरण्यात आली आहे. याआधी सलमान खानने त्याच्या एका गाण्यासाठी टॉवेलचा प्रॉपर्टी म्हणून वापर केला होता. अगदी तसेच यावेळी त्याने लुंगीचा वापर केला आहे. साऊथमध्ये पुरुष लुंगी म्हणजे ‘वेस्थी’ वापरतात. हा त्यांचा पारंपरिक पोशाख आहे. त्यामुळे दाक्षिणात्य रीती चालीनुसार तेथील लोकांचे म्हणणे आहे कि, ‘लुंगीला तुम्ही कोणत्याही सामान्य कपडयाचा दर्जा देऊ शकत नाही. एका लुंगीला धोती म्हणून नेसणं हीसुद्धा सामान्य गोष्ट असू शकत नाही’. मात्र या गाण्यात वेस्थीला सामान्य कापडासारखा दर्जा देऊन परंपरेचा आणि भावनांचा अपमान झाल्याचे यांचे म्हणणे आहे.
This is highly ridiculous and degrading our South Indian culture. This is not a LUNGI , THIS IS A DHOTI. A classical outfit which is being shown in a DISGUSTING MANNER https://t.co/c9E0T2gf2d
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) April 8, 2023
निवृत्त भारतीय क्रिकेटर लक्ष्मण श्रीरामा कृष्णन यांनीही ट्वीटरवर गाण्याला विरोध करताना म्हटलंय कि, ‘हे तर निव्वळ आमच्या दाक्षिणात्य परंपरेचा अपमान आहे. ही लुंगी नाही, ही धोती आहे. ही एक क्लासिकल आऊटफिट आहे. ज्याला खूप वाईट पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. वेस्थी परिधान करुन ते लोक धुम्रपान करत होते..? त्यांना माहित तरी आहे का दक्षिण भारतीयांसाठी वेस्थी किती पवित्र असते. सलमान खानचं बोलायचं झालं तर एकवेळ त्याला हे माहित नाही असं मानून चालू पण व्यंकटेश दग्गुबाती आणि रामचरण तर तेलुगु अभिनेते आहेत. ते कसा काय वेस्थीचा अनादर करू शकतात आणि हे तर वेस्थी नाहीचं. त्यांनी धोतीला वेस्थीसारखं परिधान केलंय’.
Discussion about this post