हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीत विश्वातील प्रसिद्ध गायिका नेहा भसीन तिच्या सुरील्या आवाजाइतकीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी नेहा वेळोवेळी आपले विविध लूक चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नेहा नेहमीच आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना आकर्षित करताना दिसते. असाच तिचा एक लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. साहजिकच नेहाच्या चाहत्यांनी तिच्या आऊटफिटचे आणि तिचे कौतुक केले आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी मात्र चांगलंच ट्रोल केलं आहे.
याआधी देखील अनेकदा नेहा भसीन तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल झाली आहे. पण कोणताही आऊटफिट एकदम बिनधास्त परिधान करणे आणि त्यामध्ये आत्मविश्वासाने वावरणे यासाठी तिचे चाहते नेहमीच तिचे कौतुक करतात. अलीकडेच गायिका नेहा भसीन प्रसिद्ध कोरियोग्राफर टेरेन्स लुईसच्या इस्टर लंचमध्ये दिसली होती. या ठिकाणी अनेक बॉलीवूड सेलेब्स उपस्थित होते. या लंचसाठी नेहाने शॉर्ट स्कर्ट आणि रिव्हलिंग शॉर्ट क्रॉप टॉप परिधान केला होता. खरंतर या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. पण तरीही शॉर्ट ड्रेसिंगमुळे नेटकाऱ्यानी तिला चांगलेच सुनावले आहे.
नेहा भसीनचा लूक पाहून युजर्सने तिला स्वस्तातली लेडी गागा म्हटले आहे. इतकेच नव्हे तर नेटकरी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘लेडी गागाची स्वस्त कॉपी.’ तर एकाने लिहिले की, ‘उर्फी जावेद तर विनाकारण बदनाम आहे… कुणीतरी हिच्याकडे पण बघा’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘हि तर उर्फी जावेदची चुलत बहीण’. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘आम्हाला बघायला लाज वाटते पण ह्यांना परिधान करायला वाटत नाही .. हे दुःख!!’
Discussion about this post